एक्स्प्लोर

Arthritis Symptoms, Causes And Prevention: तरुणांमध्ये संधिवाताची वाढती समस्या; सुरुवातीची लक्षणं दुर्लक्षित केल्यात भोगावे लागतील गंभीर परिणाम, तज्ज्ञ सांगतात...

Arthritis Symptoms, Causes, Types, Treatment And Prevention: संधिवातामुळे सांध्यांमध्ये दाह (इन्फ्लेमेशन) निर्माण होतो. त्यामुळे वेदना, सूज, कडकपणा आणि सांध्यांची हालचालींवर मर्यादा येऊ शकतात.

Arthritis Symptoms, Causes, Types, Treatment And Prevention: संधिवात (Arthritis) हा केवळ वयोवृद्धांमध्ये होणारा आजार आहे, असा गैरसमज समाजात आढळून येतो. सध्या 20, 30 आणि 40 या वयोगटातील तरुणांमध्येही संधिवाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सांध्यांमध्ये होणारी सूज, वेदना, स्नायुंचा कडकपणा आणि हालचालींमध्ये अडथळा यामुळे दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीच्या लक्षणं ओळखून वेळीच उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे.

संधिवातामुळे सांध्यांमध्ये दाह (इन्फ्लेमेशन) निर्माण होतो. त्यामुळे वेदना, सूज, कडकपणा आणि सांध्यांची हालचालींवर मर्यादा येऊ शकतात. भारतात संधिवाताच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यात तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. व्यायामाचा अभाव, पूर्वी झालेल्या सांध्यांच्या दुखापती, स्वयंप्रतिकार (ऑटोइम्यून) विकार, आनुवंशिकता तसेच चुकीची जीवनशैली यांसारख्या कारणांमुळे कमी वयातही संधिवाताचा धोका वाढतो. सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास सांध्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, असं पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अनुप गाडेकर सांगतात. 

Arthritis Symptoms, Causes And Prevention: तरुणांमध्ये संधिवाताची वाढती समस्या; सुरुवातीची लक्षणं दुर्लक्षित केल्यात भोगावे लागतील गंभीर परिणाम, तज्ज्ञ सांगतात...

खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • अनेक आठवड्यांपासून होणारी सततची सांधेदुखी
  • सकाळी उठल्यानंतर 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ सांध्यांमध्ये कडकपणा जाणवणे
  • सांध्यांभोवती सूज किंवा स्पर्श केल्यावर वेदना होणे
  • वाकणे, चालणे, जिने चढणे किंवा हातांचा वापर करताना अडचणी येणे
  • विश्रांतीनंतर किंवा शारीरिक हालचालीनंतर वेदना वाढणे
  • सांध्यांची हलचाल करताना कटकट किंवा घर्षणासारखा आवाज किंवा संवेदना जाणवणे
  • सतत थकवा किंवा ऊर्जा कमी झाल्याचे जाणवणे
  • हातांची बोटे, मनगट, पाय किंवा गुडघ्यांमधील सांधे वारंवार दुखणे

'या' व्यक्तींना अधिक धोका

ज्यांच्या कुटुंबात संधिवाताचा इतिहास आहे, लठ्ठपणा आहे, खेळताना किंवा इतर कारणांनी सांध्यांना दुखापत झाली आहे, स्वयंप्रतिकार विकार आहेत, बैठी जीवनशैली आहे किंवा शरीराची ठेवण (पोश्चर) योग्य नाही, अशा व्यक्तींमध्ये संधिवाताचा धोका अधिक असतो.

Arthritis Symptoms, Causes And Prevention: तरुणांमध्ये संधिवाताची वाढती समस्या; सुरुवातीची लक्षणं दुर्लक्षित केल्यात भोगावे लागतील गंभीर परिणाम, तज्ज्ञ सांगतात...

सांधेदुखी किंवा स्नायुंचा कडकपणा काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. केवळ वेदनाशामक गोळ्या घेऊन उपचार पुढे ढकलणे टाळावे, कारण त्यामुळे दीर्घकालीन नुकसान होण्याची शक्यता असते.

वेळीच उपचारानं संधिवातावर नियंत्रण शक्य

संधिवाताच्या उपचारांमध्ये औषधं, फिजिओथेरपी, वजन नियंत्रणात ठेवणे, नियमित व्यायाम करणे तसेच जीवनशैलीतील आवश्यक बदल यांचा समावेश असतो. अनेकजण सांधेदुखीकडे अतिश्रम किंवा व्यायामामुळे होणारा त्रास म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र, वेळीच निदान आणि योग्य उपचार घेतल्यास संधिवात हा प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येतो. त्यामुळे रुग्ण दीर्घकाळ सक्रिय, स्वावलंबी आणि वेदनामुक्त आयुष्य जगू शकतो. तरुण वयातील सांधेदुखीकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि तुमच्या सांध्यांचे आरोग्य जपा.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
FSSAI School Food Guidelines : शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget