एक्स्प्लोर

Health Tips : बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन सहज कमी होतं, पण 'या' लोकांनी सेवन करू नये

Health Tips : बडीशेपचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे अनेक तोटेही आहेत. 

Health Tips : साधारणत: जेवणानंतर अनेकदा लोक बडीशेप माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. तर, काही जण रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिऊन वजन झपाट्याने कमी करण्याचा प्रयत्न करतात. याचा आरोग्याला खूप फायदा होतो. बडीशेपचे पाणी प्यायल्याने अनेक आजार दूर राहतात. बडीशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, लोह आणि पोटॅशियम सारखे घटक मुबलक प्रमाणात असतात. म्हणूनच हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बडीशेपचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे अनेक तोटेही आहेत. सकाळी रिकाम्या पोटी एका बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे नेमके कोणते आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. 

बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे

पोटासाठी चांगली असते : बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर आहे. बडीशेपचे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास पचनक्रिया मजबूत होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची तक्रार नाहीशी होते. 

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त : बडीशेपचे पाणी प्यायल्याने पोटाला फायदा होतो. यामुळे वजन सहज कमी करता होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर : बडीशेपचे पाणी पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. म्हणूनच सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी प्यावे. 

रक्तदाब नियंत्रित राहतो : बडीशेपचे पाणी रक्तदाबही नियंत्रित ठेवते. बडीशेपमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. म्हणूनच ते रिकाम्या पोटी प्यायल्याने खूप फायदे होतात. 

हृदयासाठी फायदेशीर : बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी पिणे हृदयासाठी फायदेशीर मानले जाते.

सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिण्याचे नुकसान

पोटाचा त्रास होऊ शकतो : बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटदुखीची तक्रार दूर होते. त्यामुळे पोटात जंतुसंसर्ग झालेल्या व्यक्तीने बडीशेपचे पाणी पिऊ नये.

गर्भवती महिलांनी सेवन करू नये : गर्भवती महिलांनी सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिऊ नये. हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

त्वचेची ऍलर्जी असलेल्या लोकांनी पिऊ नये : संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी पिऊ नये. यामुळे त्वचेवर ऍलर्जी होऊ शकते. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Ghee Beauty Benefits : तूप खाऊन येईल रुप... ग्लोईंग त्वचा आणि डार्क सर्कलपासून सुटका हवीय, तुपाचा असा करा वापर

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Embed widget