![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Tips : पोटाची चरबी वाढल्याने मधुमेह कसा होऊ शकतो? तज्ञांकडून जाणून घ्या
Health Tips : पोटाभोवती चरबी वाढल्याने अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. काही वेळा जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळेही टाईप 2 मधुमेहासारख्या दिर्घकालीन आजारांचा धोका असू शकतो.
![Health Tips : पोटाची चरबी वाढल्याने मधुमेह कसा होऊ शकतो? तज्ञांकडून जाणून घ्या Health Tips why belly fat increases the risk of diabetes marathi news Health Tips : पोटाची चरबी वाढल्याने मधुमेह कसा होऊ शकतो? तज्ञांकडून जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/13/fbd57b01d54ac2a95bd561503672faa41705152752131358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health Tips : मधुमेह (Diabetes) हा एक असा रोग आहे, जो केवळ निरोगी जीवनशैली (Lifestyle) आणि औषधांनीच नियंत्रित केला जाऊ शकतो. मधुमेह पूर्णपणे नाहीसा होऊ शकत नाही. ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि लठ्ठपणा या तिन्ही गोष्टी मधुमेहासाठी जबाबदार आहेत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनाही मधुमेहाचा धोका असतो. त्यामुळे त्यांनी त्यांच्या जीवनशैलीतील चुकांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
या संदर्भात आहारतज्ज्ञ म्हणतात की, लठ्ठपणाचा मधुमेहाशीही संबंध आहे. त्यामुळे बाहेरील खाद्यपदार्थ जसे की, प्रक्रिया केलेले अन्न आणि जंक फूडपासून दूर राहावे. पण, लठ्ठपणा हा मधुमेहाचा धोका कसा आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर यामागचं कारण जाणून घेऊयात.
पोटाची चरबी वाढू शकते
पोटाभोवती चरबी (Fat) वाढल्याने अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. काही वेळा जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळेही टाईप 2 मधुमेहासारख्या दिर्घकालीन आजारांचा धोका असू शकतो. खरंतर, तुमच्या पोटावरील चरबी वाढल्यामुळे शरीरातील इन्सुलिन हार्मोनचे कार्य बिघडण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील साखरेची पातळी सतत वाढत जाते. यामुळे पुढे मधुमेहासारखे धोकादायक आजार होऊ शकतात.
लठ्ठपणा आणि मधुमेह
अनेक प्रकरणांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह (Diabetes) यांचा थेट संबंध आढळून आला आहे. त्यामुळे, निरोगी वजन राखल्याने मधुमेहासारख्या धोकादायक आजारांपासून दूर राहता येते. यासाठी नियमित व्यायाम करणं आपल्या आरोग्यासाठी फार गरजेचं आहे. व्यायामामुळे तुमच्या शरीराची लवचिकता सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. याबरोबरच कोणताही ताण अजिबात घेऊ नका, प्रक्रिया केलेले अन्न तुमच्या आहारातून काढून टाका आणि फायबर युक्त अन्नाला प्राधान्य द्या. कोणत्याही प्रकारचा कार्बोनेटेड सोडा आणि गोड पदार्थ जास्त खाऊ नका. याशिवाय तुमची रक्तातील साखर वेळोवेळी तपासत राहा आणि तुमचे वजनही नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. या जर सवयी तुम्ही नियमितपणे फॉलो केल्या तर तुम्हाला मधुमेहाची समस्या कधीच उद्भवणार नाही. तसेच, तुमची जीवनशैलीही निरोगी राहील यामुशे कोणत्याही आजाराचा धोका येणार नाही. .
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)