Vitame D : व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे 'या' समस्या उद्भवू शकतात; लक्षणं आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती जाणून घ्या
Vitame D : शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक जीवनसत्व आवश्यक आहे. पण व्हिटॅमिन डीचे स्वतःचे महत्त्व आहे. कारण, व्हिटॅमिन-डी तुमच्या शरीरासोबतच मेंदूसाठीही खूप महत्त्वाचे आहे.
Vitame D : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक प्रकारचे जीवनसत्व आवश्यक असते. परंतु, आपली जीवनशैली आणि वाईट सवयींमुळे या जीवनसत्त्वाची कमतरता अनेकदा दिसून येते. त्याच वेळी, असे बरेच लोक आहेत जे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आवश्यकतेपेक्षा जास्त जीवनसत्त्व घेतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्वांमध्ये जीवनसत्त्वांचेही महत्त्व आहे. शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्याच वेळी, व्हिटॅमिन-डीची कमतरता ही एक गंभीर आरोग्य स्थिती आहे. ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. कारण व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊन शरीर पोकळ होऊ लागते. याशिवाय पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळेही होऊ शकते.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणं :
- पुरुष किंवा स्त्रियांमध्ये टक्कल पडू शकते.
- अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो.
- व्हिटॅमिन डीच्या जखमा बऱ्या व्हायला वेळ लागतो.
- हाडांची घनता कमी होऊ लागते आणि त्यांना छिद्र पडू लागतात.
- स्नायू दुखू शकतात.
- व्यक्तीला नैराश्याची समस्या असू शकते.
लहान मुलांना व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका जास्त असतो. याशिवाय वृद्धांमध्येही कमतरतेचा धोका जास्त असतो.
व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न :
व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी सूर्यप्रकाश घेणे. परंतु, या व्यतिरिक्त, आपण या व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचे सेवन देखील करू शकता. जसे की, संत्र, गायीचे दूध, मशरूम, कॉड लिव्हर तेल, अंड्यातील पिवळं बलक, सॅल्मन फिश इ.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
- Health Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha