Health Tips : कोरोना काळात रिकाम्या पोटी खा 'हे' पदार्थ, Immunity होईल मजबूत
Health Tips : वाढत्या कोरोनाच्या काळात शरीराची इम्युनिटी वाढविणे खूप गरजेचे आहे. इन्युनिटीला मजबूत करण्यासाठी रिकाम्या पोटी या पदार्थांचा आहारात समावेश करणे फायद्याचे आहे.
![Health Tips : कोरोना काळात रिकाम्या पोटी खा 'हे' पदार्थ, Immunity होईल मजबूत Health tips to eat these foods on an empty stomach daily during covid-19 Health Tips : कोरोना काळात रिकाम्या पोटी खा 'हे' पदार्थ, Immunity होईल मजबूत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/17/e4c9113831476f041f352035938f90e7_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Covid-19 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासठी शरीराची इम्युनिटी मजबूत असणे काळाची गरज झाली आहे. शरीराची इम्युनिटी कमी झाली तर वारंवार आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे निरोगी शरीरासाठी आणि इम्युनिटी वाढविण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी काही हेल्दी पदार्थ खावेत. आपल्यापैकी कित्येकांना सकाळ-सकाळ चहा पिण्याची सवय असते. पण, यामुळे तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. तुमची इम्युनिटी मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा
गरम पाण्यात मध टाकून पाणी प्या :
सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी शरीरासाठी फायदेशीर ठरते. यामुळे तुमची इम्युनिटी मजबूत होते. गरम पाण्यात मध टाकलेले पाणी प्यायल्याने तुमची पचनशक्तीसुद्धा चांगली राहते. तसेच, घशाचे विकार होत नाहीत. रिकाम्या पोटी मध घातलेले गरम पाणी प्यायल्याने तुमची स्किनमध्येही ओलावा टिकून राहतो.
तुळस-अद्रकचे पाणी प्या :
हिवाळ्यात तुळस आणि अद्रक गरम पाण्यात मिक्स केलेले पाणी प्यायल्याने तुमची प्रकृती चांगली राहते. यामध्ये सामाविष्ट असलेले तत्व शरीराची इम्युनिटी वाढविण्यासाठी मदत करतात. अद्रकमध्ये व्हिटामिन सी असते. तर तुलशीत व्हिटामिन सी आणि कॅल्शियम असतात.
ओट्सचे जाडे भरडे पीठ खाण्याचे फायदे :
जर तुम्ही रिकाम्या पोटी चांगला पोटभर नाश्ता करू इच्छिता तर तुम्ही रोज ओट्सचे भरडे खाऊ शकता. यामध्ये फायबर, प्रोटीन यांसारखे पोषक तत्व सामाविष्ट आहेत. यामुळे तुमची इम्युनिटी लवकर वाढेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हे ही वाचा :
- Rashmika Mandana : नॅशनल क्रश रश्मिका मंदना सारखा फिटनेस हवाय? फॉलो करा हा वर्क आऊट प्लॅन अन् डाएट
- Health Tips : हिवाळ्यात रोज रात्री गरम पाणी प्यायल्याने होतात 'हे' फायदे
- Coronavirus : चहा ऐवजी 'या' तीन काढ्यांचे करा सेवन, संसर्गापासून होईल संरक्षण, चवही राहील कायम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)