Health Tips : कढीपत्त्याचे 'हे' सर्वोत्तम 7 उपाय तुमच्या केसांना घनदाट बनवतील; आजच वापरून पाहा
Health Tips : कढीपत्त्यामुळे टाळूच्या रक्ताभिसरणाला चालना मिळते. या गुणधर्मांमुळे नवीन केस वाढण्यास वाव असतो.
Health Tips : कढीपत्ता हा असा एक आहे ज्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पिढ्यानपिढ्या केसांसाठी कढीपत्त्याचा वापर करतात. कढीपत्ता जीवनसत्त्वांचा समृद्ध स्त्रोत आहे. टाळूचं पोषण करण्यासाठी आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जातो. कढीपत्ता केसांना कंडीशनिंग करून नैसर्गिक चमक देतो. तर, या ठिकाणी आपण कढीपत्त्याचे आणखी फायदे जाणून घेणार आहोत. जे केसांच्या वाढीसाठी तुम्हाला फायदेशीर ठरतील.
कढीपत्त्याचे 7 फायदे :
1. केसांच्या वाढीस प्रोत्साहन
कढीपत्त्यात व्हिटॅमिन सी आणि बी, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. कढीपत्त्यामुळे टाळूच्या रक्ताभिसरणाला चालना मिळते. या गुणधर्मांमुळे नवीन केस वाढण्यास वाव असतो आणि टाळूचे आरोग्यही सुधारते. केसांच्या वाढीसाठी आवळा, मेथी आणि कढीपत्ता हे एक उत्तम मिश्रण आहे. एका भांड्यात मेथी आणि कढीपत्ता समान प्रमाणात ठेवा आणि त्यात आवळा घाला. जाड पेस्ट बनवण्यासाठी साहित्य बारीक करा. ते तुमच्या टाळूवर लावा आणि 30 ते 45 मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवा.
2. केसांतील स्प्लिट्स कमी करतात
कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि प्रथिने यांसारखी गुणधर्म असतात. स्प्लिट एंड्सची समस्या कमी करण्याचे कामदेखील कढीपत्ता करतं.
3. कढीपत्ता कोंडा कमी करतो
कढीपत्त्यात अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे टाळूतील कोंडा काढून टाकण्यास मदत करतात. मूठभर कढीपत्ता बारीक करून घट्ट पेस्ट बनवा आणि ही पेस्ट दह्यात मिसळा. दही टाळूला हायड्रेट करते आणि त्यातून मृत पेशी काढून टाकते. ही पेस्ट टाळूवर लावा आणि मसाज करा. कोमट पाण्याने धुण्यापूर्वी किमान अर्धा तास ठेवा.
4. कढीपत्ता कोरड्या केसांना पोषण देतो
कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म कोरड्या केसांच्या उपचारात मदत करतात आणि केसांना आवश्यक चमक आणि जिवंतपणा देतात.
5. कढीपत्ता केसांची नैसर्गिक चमक वाढवतो
केसांच्या मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अमीनो ऍसिडचा समृद्ध स्रोत म्हणून, कढीपत्ता केसांच्या पट्ट्यांना चमक देतात. तसेच, तुम्ही अधिक चमक मिळविण्यासाठी, नारळ आणि कढीपत्ता सीरम लावू शकता. गरम पॅनमध्ये थोडे खोबरेल तेल आणि मूठभर कढीपत्ता घाला. तेल गरम करून गॅस बंद करून तेल सेट होऊ द्या. सीरम थंड झाल्यावर ते गाळून केसांना लावा.
6. कढीपत्ता केस गळतीवर नियंत्रण ठेवतो
जीवनसत्त्वे, प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत, कढीपत्ता टाळूचे पोषण करण्यास, केसांच्या कूपांना मजबूत करण्यास मदत करतो. कढीपत्ता आणि कांद्याचा रस केसगळती नियंत्रित करण्यासाठी आश्चर्यकारक काम करू शकतात. 10 ते 15 ताजा कढीपत्ता घ्या आणि त्यांची गुळगुळीत पेस्ट बनवा. पेस्टमध्ये कांद्याचा रस घाला आणि केसांना लावा. त्यानंतर केस शॅम्पूने धुवा.
7. केसांना पांढरे होण्यापासून बचाव
केस अकाली पांढरे होणे कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस आणि कढीपत्ता हेअर मास्क देखील वापरू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :