(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : दिवसाची सुरुवात 'या' हर्बल टी ने करा; तुम्ही दिवसभर उत्साही राहालच पण अनेक आजारही होतील दूर
Health Tips : हर्बल टी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि तणाव कमी होतो.
Health Tips : जगभरात चहाचे (Tea) चाहते अनेक लोक आहेत. अनेकांच्या दिवसाची सुरुवातच चहाने होते. आजकाल आरोग्य लक्षात घेऊन चहाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. जसे- ग्रीने टी, रेड टी, ब्लॅक टी इ. हे सर्व चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्याचप्रमाणे हर्बल चहा प्यायल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे आढळतात. ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. हर्बल टी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि तणाव कमी होतो. याशिवाय तुमची पचनसंस्थाही निरोगी राहते आणि वजन कमी होण्यासही मदत होते. तुमच्यासाठी कोणते हर्बल टी फायदेशीर ठरू शकतात या संरदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात या चहाने करू शकता, ज्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतील.
पुदिन्याचा चहा
पुदिन्याचा चहा प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारते आणि पोटाशी संबंधित समस्याही कमी होतात.
आल्याचा चहा
आल्याचा चहा प्यायल्याने आरोग्य तर सुधारतेच पण शरीराला ऊर्जाही मिळते.
कॅमोमाइल चहा
कॅमोमाइल चहा अनेकदा झोपण्यापूर्वी प्यायला जातो. हे प्यायल्याने तणाव कमी होतो आणि मनाला शांती मिळते.
हळदीचं पाणी
हळदीचं पाणी प्यायल्याने सूज कमी होते, याबरोबरच यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील आजारांना दूर ठेवतात.
हिबिस्कस चहा
हिबिस्कस चहामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. हा चहा प्यायल्याने थकवा दूर होतो.
दालचिनी चहा
सकाळी दालचिनीचा चहा पिणे खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
डँडेलियन रूट चहा
डँडेलियन रूट चहा पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे प्यायल्याने तुमचे यकृत निरोगी राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
अश्वगंधाचा चहा
अश्वगंधा चहा केवळ तणाव कमी करत नाही तर मेंदूला तीक्ष्ण देखील करण्यास मदत करतो
मोरिंगा चहा
मोरिंगा चहा प्यायल्याने दिवसभर ऊर्जा मिळते. सकाळी चहा पिणे हा एक चांगला पर्याय आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :