(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : रक्ताभिसरण सुधारण्यासाठी प्राणायामचे 'हे' 5 व्यायाम कराच; वाचा पद्धत आणि जबरदस्त फायदे
Health Tips : योग हा एक नैसर्गिक आणि सुरक्षित मार्ग आहे आरोग्य जपण्याचा यासाठी अनेकजण योगला जास्त महत्त्व देतात.
Health Tips : तुम्हाला जर हृदयाचं आरोग्य नीट राखायचं असेल तर त्यासाठी योग्य श्वासोच्छवासाचा व्यायाम गरजेचा आहे. कारण योग (Yoga) केल्याने शरीरातील अनेक समस्यांवर मात करता येते. तसेच, योग हा एक नैसर्गिक आणि सुरक्षित मार्ग आहे आरोग्य जपण्याचा यासाठी अनेकजण योगला जास्त महत्त्व देतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, “तुमच्या हृदय आणि मेंदूच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने स्ट्रोक, पक्षाघात, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, तीव्र ताण आणि चिंता यांसारख्या गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात. म्हणून, तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी योगाभ्यास आणि सकारात्मक जीवनशैलीतील बदल करणं गरजेचं आहे. प्राणायाम हा योगाचा एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यामध्ये श्वास नियंत्रण तंत्रांचा समावेश आहे जे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
1. भस्त्रिका प्राणायाम :
पद्धत : दीर्घ श्वास घ्या. तुमच्या फुफ्फुसात श्वास रोखून ठेवा. आता पूर्णपणे श्वास सोडा. इनहेलेशन आणि श्वास सोडण्यासाठी 1:1 गुणोत्तर ठेवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही 6 वेळा श्वास घेत असाल तर 6 वेळा श्वास सोडा.
2. भ्रामरी प्राणायाम (Brahmari Pranayama: Bee Breath)
पद्धत : पद्मासनात अथवा मांडी घालून बसा. दोन्ही नाकातून जोराने श्वास आत खेचा आणि बाहेर काढा. घाम येईपर्यंत ही क्रिया करावी. शेवटी नाकाद्वारे शक्य तितका दीर्घ श्वास घ्या आणि जितका वेळ श्वास रोखता येईल तितका वेळ रोखून ठेवावा. नंतर दोन्ही नाकपुडयांद्वारे श्वास बाहेर सोडा. सुरुवातीला जसजसा तुम्ही जोराने श्वास घ्याल तशीच तुमच्या रक्ताभिसरणाची गती वाढते आणि शरीरात उष्णता वाढत जाते. परंतु शेवटी घाम सुटल्यावर शरीर थंड पडते.
3. उज्जायी
पद्धत : मांडी घालून अथवा पद्मासनात बसावं. तोंड बंद ठेवा. आता हनुवटी गळपट्टीच्या हाडामध्ये व उरोस्थीवरील खोबणीत टेकू द्या. मानेला जास्त ताण देऊ नये. डोळे बंद करा आणि दोन्ही नाकातून हळुवारपणे दीर्घ श्वास घ्या. फुप्फुसे पूर्ण भरेपर्यंत श्वास घ्या. त्यावेळी ‘सस्’ असा आवाज होणे आवश्यक आहे. आता जीभ उलटी करून जिभेचा शेंडा तळ्याला आतल्या बाजूस लावून शक्य जितक्या वेळ रोखता येईल तेवढा वेळ रोखावे याला कुंभक म्हणतात. नंतर डोळे वर करा. व हळुवारपणे श्वास बाहेर सोडावे. यावेळी उजव्या हाताने उजवे नाक बंद करून डाव्या नाकाद्वारे छाती फुगवत श्वास बाहेर सोडावा. श्वास बाहेर जाताना घर्षणयुक्त आवाज येतो. हा आवाज एकसारखा असला पाहिजे.
4. अनुलोम-विलोम
अनुलोम विलोम हा प्राणायामाचा प्रकार खूप जणांना माहीत आहे. अनुलोम- विलोम या प्राणायाममुळे मन शुद्ध होते, ताणतणावतून त्वरीत आराम मिळतो, निरोगी फुफ्फुसे आणि शरीराला मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. नियमित व्यायाम केल्यामुळे मज्जासंस्थेलाही चालना मिळते.
पद्धत : सर्वात आधी पद्मासनात बसा. आधी डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करा. उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास घ्या. श्वास घेऊन झाला की डाव्या नाकपुडीवरचा अंगठा काढून घ्या. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबून बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे सोडा. ही प्रक्रिया वारंवार करत राहा.
5. सीत्कारी
या प्राणायाममुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. याचा सराव उन्हाळ्यात केला तर तो अधिक परिणामकारक ठरतो.
पद्धत : प्रथम पद्मासनात किंवा मांडी घालून बसा. आता दात एकमेकांवर दाबून ठेवा, जीभ दातांना लावा. जिभेचं टोक टाळ्याला लावा. श्वास आत घेऊन झाल्यावर तोंड बंद करा आणि शक्य होईल तितका वेळ करा. त्यानंतर दोन्ही नाकाने रेचक करा म्हणजे श्वास बाहेर सोडा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : पॅनिक अॅटॅक आणि हार्ट अटॅक यामध्ये तुमचाही गोंधळ होतोय? सावध राहा, अन्यथा...