Health Tips : 15% प्रोटीन सप्लिमेंट्सचा वापर आरोग्यासाठी घातक : सर्वेक्षणातून स्पष्ट
Health Tips : सर्वेक्षणादरम्यान तपासण्यात आलेल्या 144, 345 नमुन्यांपैकी 4,890 नमुने असुरक्षित असल्याचे आढळून आले.
Health Tips : FSSAI Food Safety and Standards Authority of India (FSSAI) यांनी एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणा दरम्यान असे आढळून आले आहे की, 2021, 2022 दरम्यान जे लोक जास्त सप्लिमेंट्सचा वापर करतात यामुळे त्यांच्या शरीराला हानी पोहोचते. जवळपास 15 टक्के सप्लिमेंट्स या आरोग्यासाठी घातक असतात. असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
सर्वेक्षणादरम्यान तपासण्यात आलेल्या 144, 345 नमुन्यांपैकी 4,890 नमुने असुरक्षित असल्याचे आढळून आले आणि 16,582 नमुने निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे. तसेच, तब्बल 11,482 नमुन्यांमध्ये लेबलिंगमध्ये दोष आढळतो. तर, काही पॅकेजिंगवर दिशाभूल करणारी माहिती आढळून आली आहे.
प्रोटीन पावडचा वापर कशासाठी करतात?
प्रथिने पावडर सामान्यतः स्नायूंना अधिक स्ट्रॉंग करण्यासाठी, शरीराला जास्त ऊर्जा देण्यासाठी वापरली जाते. अन्न नियामकाने किमान 4,900 केसेसवर कारवाई सुरू केली आहे, इतर 28,906 केसेसमध्ये चौकशी सुरु आहे असे सांगण्यात आले आहे. आहारातील पूरक आहाराव्यतिरिक्त, अन्न नियामक औषध आणि पौष्टिक उत्पादनांच्या गुणधर्मांसह औषधांना पर्याय म्हणून विकल्या जाणार्या न्यूट्रास्युटिकल्सना आळा घालण्यासाठी आणि घटकांच्या चुकीच्या लेबलिंगचे नियमन करण्यासाठी ही यंत्रणा काम करते आहे.
जास्त प्रमाणात प्रोटीनचे सेवन केल्याने 'हे' नुकसान होते
जर तुम्ही ठराविक प्रमाणात प्रोटीनचे सेवन केले तर तुम्हाला अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. काही संशोधन असे आढळून आले आहे की जास्त प्रमाणात प्रोटीन खाल्ल्याने पोट आणि पाचन समस्यांव्यतिरिक्त इतर दुष्परिणाम होऊ शकतात. यामध्ये पचन संस्था, मूत्रपिंडाची समस्या, त्वचेची समस्या, सांधे दुखी आणि किडनी स्टोनची समस्या अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
तज्ज्ञांनी आरोग्य पूरक पदार्थांची गुणवत्ता तपासण्यावर भर दिला
“वैद्यकीय पर्यवेक्षणाशिवाय आरोग्य पूरक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे सेवन केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतात आणि जर उत्पादनाची गुणवत्ता निकृष्ट असेल तर ते तुमच्या मूत्रपिंड आणि इतर महत्वाच्या अवयवांवर हानिकारक ठरू शकतात, असेही सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :