(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : वाढत्या वयात मेंदू निरोगी ठेवण्यासाठी संगीत गरजेचं; अभ्यासातून स्पष्ट
Music Helpful For Brain : तुम्हाला जर तुमच्या स्मरणशक्तीला तीक्ष्ण ठेवायचं असेल तर त्यासाठी संगीत ऐकणं गरजेचं आहे.
Music Helpful For Brain : ज्याप्रमाणे लिहीणे, वाचणे, फिरणे हे आपले छंद असतात तसाच गाणी ऐकणे (Listning Music) हा देखील अनेकांचा छंद असतो. लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येकजण आपापल्या आवडीची गाणी (Music) अगदी आनंदात ऐकताना, गाताना, गुणगुणताना आपल्याला दिसतात. खरंतर, मानसिक स्वास्थ्यासाठी (Mental Health) संगीत ऐकणं फायदेशीर मानलं जातं. यामुळे आपल्या मेंदूचे आरोग्य चांगलं राहतं असं म्हटलं जातं. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याच संदर्भात एक खुलासा करण्यात आला आहे. या अभ्यासात असं म्हटलंय की, वाढत्या वयानुसार संगीत ऐकल्याने तुम्हाल अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ जेरिएट्रिक सायकिएट्री जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या अभ्यासात संशोधकांनी मेंदूच्या आरोग्यासाठी संगीत ऐकणं, संगीताशी संबंधित एखादं वाद्य वाजवणं किंवा ग्रूपमध्ये गाणी गायल्याने असं म्हटलं आहे. याचाच परिणाम पाहण्यासाठी 40 वर्षांहून अधिक वयोगटातील अशा एक हजारांहून अधिक लोकांवर हा अभ्यास करण्यात आला आहे.
स्मरणशक्तीला तीक्ष्ण करतं संगीत
साधारण दहा वर्षांपासून सुरु असलेल्या या 'प्रोटेक्ट' नावाच्या संशोधनासाठी 25 हजारांहून अधिक लोकांनी सहभाग दाखवला. यावरून असं आढळून आलं आहे की, पियानो सारखी वादय वाजविल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होऊ शकते. तसेच, काम करण्याच्या गतीमानतेतही फरक पडू शकतो. संगीत ऐकल्याने एक प्रकारची मानसिक शांती मिळते, आपाल मूड चांगला राहतो. तसेच, काम करण्यातही उत्साह येतो असंही या अभ्यासाचून आढळून आलं आहे.
यूकेच्या एक्सेटर विद्यापीठातील डिमेंशिया संशोधनाचे प्राध्यापक. ॲन कॉर्बेट म्हणतात, “आमच्या ‘प्रोटेक्ट’ अभ्यासाने आम्हाला प्रौढांच्या मोठ्या गटातील संज्ञानात्मक कार्यप्रदर्शन आणि संगीत यांच्यातील संबंध एक्सप्लोर करण्याची उत्तम संधी दिली. "एकंदरीत आम्हाला वाटते की संगीतमय असणे हा मेंदूची लवचिकता वापरण्याचा एक मार्ग असू शकतो."
तसेच, ते पुढे असंही म्हणाले की, "या संबंधित आणखी संशोधनाची गरज आहे. पण, आमच्या निष्कर्षांवरून असे सूचित होते की, संगीत शिक्षणाचा प्रसार करणे मेंदूच्या आरोग्यासाठी चांगल्या जीवनशैलीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण असू शकते, जसे की ते प्रौढांसाठी आहे," ते म्हणाले.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :