Health Tips : PCOS मुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतायत? यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' बदल
Health Tips : पीसीओएसच्या समस्येने त्रस्त असलेल्या बहुतांश महिलांना चेहऱ्यावर मुरुमांचा त्रास सहन करावा लागतो.
Health Tips : PCOS म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही समस्या आजकाल प्रत्येक महिला आणि मुलींमध्ये अगदी सामान्य झाली आहे. ही समस्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळे म्हणजेच शरीरातील रसायनांमुळे उद्भवते. PCOS मध्ये, महिलांच्या अंडाशयात लहान फोड किंवा गाठी तयार होतात. यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. या गाठ्यांमुळे अंडाशय नीट कार्य करू शकत नाहीत.
स्त्रियांमधील अंडाशयांचे काम हार्मोन्स तयार करणे आणि ते रक्तात सोडणे आहे. पण, PCOS मध्ये हे हार्मोन्स योग्य प्रमाणात तयार होत नाहीत. यामुळे मासिक पाळी नियमित येत नाही, शरीरावर जास्तीचे केस वाढू लागतात आणि लठ्ठपणा देखील येऊ शकतो. PCOS मुळे अनेक मुली आणि महिलांना चेहऱ्यावर, खांद्यावर आणि पाठीवर मुरुमं येऊ लागतात. हे पिंपल्स खूप वाईट दिसतात. तसेच, यामुळे तुमचा आत्मविश्वासही कमी होतो.
ग्लूटेन फ्री
PCOS असलेल्या महिलांनी आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे. जेणेकरून चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करता येतील. ब्रेड, नूडल्स इत्यादी गव्हापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये 'ग्लूटेन' असते. या ग्लूटेनमुळे अनेकांना पोटाशी संबंधित समस्या तसेच पिंपल्सचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे अशा लोकांनी 'ग्लूटेन फ्री डाएट' फॉलो करणं गरजेचं आहे.
कंट्रोल हार्मोन्स
मुरुमांसारख्या PCOS ची समस्या कमी करण्यासाठी, आपल्याला आपल्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन आणि इंसुलिन सारख्या काही संप्रेरकांची पातळी संतुलित करणं गरजेचं आहे. विशिष्ट प्रकारचे आहार आणि औषधी वनस्पती जसे की, ओमेगा 3, अश्वगंधा, व्हिटॅमिन डी इत्यादी टेस्टोस्टेरॉन कमी करण्यास मदत करू शकतात. याबरोबच दैनंदिन व्यायाम आणि संतुलित आहारानेही इन्सुलिनची पातळी राखता येते. मधुमेह किंवा उच्च रक्तातील साखरेची तक्रार असेल तर त्यावरही नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
भरपूर पाणी प्या
PCOS मुळे आपल्या चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्समुळे अनेकदा चिडचिड होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. PCOS मध्ये शरीराची pH पातळी बिघडते ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स उठू लागतात. पाणी शरीरातील पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते आणि शरीरातील घाण आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.