Health Tips : व्यायामात मन लागत नाहीये? व्यायाम सुरु करण्यापूर्वी 'या' महत्त्वाच्या गोष्टी स्वतःला सांगा
How to start exercise : जेव्हा जेव्हा तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येऊ लागतो तेव्हा स्वतःला तुमच्या ध्येयाची आठवण करून द्या.
How to start exercise : आपल्या सर्वांनाच स्वतःला तंदुरुस्त आणि स्लिम दिसायचे आहे. पण यासाठी व्यायाम आणि शारीरिक हालचालींबरोबरच आहारावरही नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. पण, ते सगळ्यांच्याच नियंत्रणात नाही. कारण खाण्यावर कंट्रोल करणं फार कमी लोकांना जमतं. हाच विचार करून अनेक लोक व्यायाम सुरु करण्याआधीच हा विचार डोक्यातून काढून टाकतात. आणि व्यायाम सुरु करत नाहीत.
तुम्हालाही व्यायाम करायचा असेल पण सुरूवात कशी करावी हे कळत नसले. किंवा मध्येच ब्रेक पडलाय आणि पुन्हा सुरु करायचाय तर आम्ही अशा काही गोष्टी सांगणार आहेत, ज्याचा विचार करून तुम्ही व्यायाम सुरू कराल आणि पुन्हा कधीही सोडणार नाही.
व्यायामाची दिवसाची सुरुवात कशी करावी?
- सर्वात आधी, स्वतःला हे पटवून द्या की तुम्हाला व्यायाम सुरु करायचा आणि आणि तो का करायचा आहे.
- एकदा व्यायाम करायचं ठरवल्यानंतर तुमचा गोल फिक्स करा. जसे की, तुम्हाला किती किलो कमी करायचे आहे.
- मग एक डेडलाईन फिक्स करा की इतक्या दिवसांत मला इतकं वजन कमी करायचं आहे.
- दररोज एकाच वेळी व्यायाम करण्याचा निर्णय घेऊ नका. कारण सुरुवातीला काही दिवस चांगले वाटतात, त्यानंतर ते त्रासदायक वाटू शकतं. त्यामुळे आठवड्यातून फक्त 3 दिवस सुरू करा. प्रत्येक पर्यायी दिवशी व्यायाम करा.
- सुरुवातीलाच जास्त व्यायाम करू नका. त्यापेक्षा सुरुवातीला सर्वात सोप्या व्यायामांपासून सुरुवात करा. जेणेकरून शेवटपर्यंत उत्साह टिकून राहील.
व्यायाम कंटाळवाणा वाटतो?
- जेव्हा जेव्हा तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येऊ लागतो तेव्हा स्वतःला तुमच्या ध्येयाची आठवण करून द्या. स्वतःला आव्हान द्या. हे तुम्हाला सातत्य राखण्यास मदत करेल.
- व्यायाम करताना कंटाळा येतोच असे नाही. हे बहुतेक लोकांसोबत घडते. पण त्यासाठी तुमच्या मनातील भूक जागृत करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तंदुरुस्त होण्यास सुरुवात कराल, जेव्हा तुमचे शरीर आकारात येऊ लागेल, तेव्हा तुमची फिटनेसची भूकही वाढू लागेल.
- फक्त व्यायामच नाही तर आहाराकडेही लक्ष द्या. तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुमच्या जीवनशैलीनुसार हेल्दी डाएट चार्ट फॉलो करा. तुम्ही त्यात एक चीट-डे देखील ठेवू शकता जेणेकरून एक दिवस तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ खायला मिळतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :