Health Tips : कोथिंबीर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त? 'या' औषधांबद्दल जाणून घ्या
Health Tips : उच्च कोलेस्ट्रॉल हा हृदयविकार वाढवणारा एक प्रमुख घटक आहे.
Health Tips : उच्च कोलेस्ट्रॉल (Cholesterol) हृदयाच्या आरोग्यासाठी एक मोठी समस्या आहे. हे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते आणि रक्ताच्या सामान्य प्रवाहात व्यत्यय आणते, ज्यामुळे हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या गंभीर परिणामांचा धोका लक्षणीय वाढतो. उच्च कोलेस्ट्रॉल हा हृदयविकार वाढवणारा एक प्रमुख जोखमीचा घटक आहे. बदलती जीवनशैली (Lifestyle) आणि आहारातील बदल हे यामागील प्रमुख कारण आहे.
काही अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोथिंबीर सुद्धा कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करू शकते. कोथिंबीर खरंच इतकी फायदेशीर आहे का? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
कोथिंबीर कोलेस्ट्रॉल कमी करते का?
कोथिंबीर आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे काही अभ्यासातून कोथिंबीरचे आश्चर्यकारक आरोग्य फायदे दिसून येतात. कोथिंबीरची पाने उच्च रक्तदाब आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलसह हृदयविकाराच्या जोखमीचे घटक कमी करू शकतात. अभ्यासात असे आढळून आले की, हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोथिंबीर तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.
रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो
दुसर्या संशोधन अहवालात असे आढळून आले आहे की, कोथिंबीरचा अर्क लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून कार्य करतो, ज्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर काढण्यात मदत होते. यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. उच्च कोलेस्टेरॉलच्या समस्येसह, उच्च रक्तदाब देखील हृदयरोगांसाठी एक गंभीर धोका घटक आहे. कोथिंबीरीची पाने आणि बियांचे सेवन केल्याने दोन्हीचा धोका कमी होण्यास मदत होते.
मधुमेहामध्ये कोथिंबिरीचे फायदे
उच्च रक्तातील साखरेच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांच्या आरोग्यासाठीही कोथिंबीर फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. प्राण्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोथिंबीरचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची क्रिया एन्झाईमच्या क्रियाकलापांना चालना देऊन कमी होते, ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवणे सोपे होते.
यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म याला खास बनवतात
संशोधकांनी सांगितले की, कोथिंबीरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असले तरी, त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म हे सर्वात खास बनवते. अँटिऑक्सिडंट पदार्थ शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे धोके कमी करतात, जे केवळ त्वचेसाठी फायदेशीर नाही तर कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी देखील फायदे आहेत. संशोधकांना असे आढळून आले आहे की आहारात अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण वाढवल्याने दिर्घकालीन आजार होण्याच्या जोखमीपासून संरक्षण मिळू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :