Health Tips : वारंवार डोकेदुखीचा त्रास होतोय? तर, 'या' 9 गंभीर कारणांकडे दुर्लक्ष करू नका
Health Tips : जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या वारंवार जाणवत असेल तर ती सामान्य समजण्याची चूक करू नका. कारण ही चिंताजनक बाब असू शकते.
Health Tips : आजकाल तणाव आणि चिंता याचबरोबर अनेक कारणांमुळे डोकेदुखीची समस्या सामान्य झाली आहे. डोकेदुखीचे कोणतेही एक कारण नाही, पण अनेक कारणांमुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. सहसा लोक डोकेदुखी ही एक सामान्य समस्या मानण्याची चूक करतात. तर, कधी कधी हे काही गंभीर समस्येचे लक्षण देखील असू शकते. डोकेदुखीचे अनेक प्रकार आहेत, जसे की तणाव किंवा चिंता, क्लस्टर डोकेदुखी, मायग्रेन आणि सायनस डोकेदुखी इ. जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या वारंवार जाणवत असेल तर ती सामान्य समजण्याची चूक करू नका. कारण ही चिंताजनक बाब असू शकते.
आज आम्ही तुम्हाला अशाच 10 कारणांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे डोकेदुखीची समस्या उद्भवते. जर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायला विसरू नका.
डोकेदुखीची 'ही' 10 कारणे आहेत
1. तणाव आणि चिंता : जर तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीची काळजी वाटत असेल किंवा तणाव असेल तर त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. कारण या दोन्ही घटकांमुळे डोकेदुखीचा त्रास होतो.
2. अपुरी झोप : पुरेशी झोप न मिळाल्यास डोकेदुखीची समस्या उद्भवते. कारण झोपेच्या कमतरतेमुळे डोकेदुखीची समस्या अनेकदा लोकांमध्ये दिसून येते.
3. डिहायड्रेशन : डिहायड्रेशन हे देखील डोकेदुखीचे कारण असू शकते. त्यामुळे शरीरात कधीही पाण्याची कमतरता भासू नये. वेळोवेळी भरपूर पाणी पीत राहा.
4. डोळ्यांवर जास्त ताण देणे : लॅपटॉपवर काम करणे किंवा मोबाईल स्क्रीनकडे जास्त वेळ टक लावून पाहणे यामुळे देखील डोकेदुखी होऊ शकते आणि दीर्घकाळ डोळ्यांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला लॅपटॉपवर बराच वेळ काम करावे लागत असेल, तर ब्ल्यू-रे संरक्षणात्मक चष्मा नक्कीच वापरा.
5. सायनस : दीर्घकाळ किंवा वारंवार डोकेदुखी हे सायनस संसर्ग किंवा क्रॉनिक सायनुसायटिसचे लक्षण असू शकते.
6. हार्मोनल बदल : हार्मोन्सच्या पातळीतील चढ-उतारांमुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. म्हणूनच आपला आहार निरोगी ठेवा आणि व्यायाम करा.
7. कॅफिन : जर तुम्ही चहा किंवा कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
8. औषधांचा अतिवापर : वेदना कमी करणाऱ्या औषधांच्या अतिवापराने देखील डोकेदुखी होऊ शकते.
9. इतर कारणे : मायग्रेन, उच्च रक्तदाब किंवा ब्रेन ट्यूमर यांसारख्या आजारांमुळेही डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे, जर तुम्हाला वारंवार डोके दुखत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :