(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : मेटाबॉलिज्म वाढेल, वजनही कमी होईल; फक्त 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा
Health Tips : चयापचय गती वाढवण्यासाठी, योग्य आहार घेणे किंवा त्यात बदल करणे खूप महत्वाचे आहे.
Health Tips : आपल्या शरीरासाठी चयापचय किती महत्त्वाचे आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. चयापचय आपल्या पोटाच्या आरोग्याशी निगडीत आहे. जर ते कमी असेल तर पोटाशी संबंधित समस्या आपल्याला त्रास देतात. तज्ज्ञांच्या मते, कॅलरीज बर्न करण्यात चयापचय महत्त्वाची भूमिका बजावते. व्यक्तिपरत्वे त्यात खूप फरक पडत असला तरी ते तपासताना आपले वय आणि लिंगही लक्षात ठेवले जाते.
चयापचय गती वाढवण्यासाठी, योग्य आहार घेणे किंवा त्यात बदल करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला चयापचय वाढवायचा असेल तर तुमच्या ताटात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत… येथे जाणून घ्या.
अंडी खा
रिपोर्ट्सनुसार, एका उकडलेल्या अंड्यामध्ये सुमारे 6.29 ग्रॅम प्रोटीन असते. विशेष म्हणजे यात कॅलरी कमी आणि प्रथिने जास्त असतात. जे लोक मांसाहार करतात त्यांनी दररोज मर्यादेत उकडलेले अंडे खावे. जर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या असतील तर अंड्याचा पिवळा भाग खाण्याची चूक करू नका.
अंबाडी बिया
अंड्यांप्रमाणेच अंबाडीच्या बियांमध्येही भरपूर प्रथिने असतात. यामध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. हे खाल्ल्याने आपली चयापचय क्रिया सुधारते. वास्तविक, बियांमध्ये फायबर असते जे आपल्या आतड्यांचे आरोग्य सुधारते.
दूध आणि दहीचा वापर करा
कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत असलेले दूध पिल्याने आपला चयापचय दर देखील सुधारतो. तसे, प्रोबायोटिक फूड दही खाल्ल्याने आपले शरीर थंड तर राहतेच पण पोटाच्या आरोग्यालाही फायदा होतो. जरी हिवाळा असला तरी, आपण दररोज एक वेळेस योग्य प्रमाणात दही सेवन केले पाहिजे.
आलं गुणकारी
आलं वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असल्याचेही अभ्यासातून समोर आले आहे. त्याचे पाणी रोज प्यायल्याने ग्लुकोजची पातळी सुधारते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. याशिवाय यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या कमी होते.
बीन्सचं सेवन करा
राजमा किंवा चणे हे प्रथिने आणि अमीनो ऍसिडने समृद्ध असतात. हे खाल्ल्याने शरीरात प्रोटीनचे प्रमाण वाढते आणि स्नायू मजबूत होतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जे काही स्नायूंचे वस्तुमान राखते ते आपल्या चयापचयसाठी चांगले असते. लक्षात ठेवा की जर तुम्ही बीन्सला तुमच्या आहाराचा भाग बनवत असाल तर त्यासोबत हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : तुमच्या 'या' सवयींमुळे पाठदुखीची समस्या वाढू शकते; सुटका मिळवण्यासाठी 'हे' व्यायाम करा