Health Tips : तुमच्या पायात जळजळ होत असेल तर सावध व्हा! 'या' गंभीर आजारांचं लक्षण असण्याचा धोका
Health Tips : तुम्हालाही अनेकदा पायात जळजळ आणि खाज येत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करण्याची गरज नाही.
Health Tips : अनेकदा विनाकारण तुमच्याही पायात (Legs) जळजळ आणि खजा येते का? वारंवार तुम्हालाही अशा समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे गंभीर संंमस्यांचं सुरुवातीचं लक्षण देखील असू शकतं. डॉक्टरांच्या मते, असे अनेक गंभीर आजार आहेत ज्यांची सुरुवातीची लक्षणं ही पायांच्या तळव्यांमध्ये दिसतात. त्यामुळे पायात जळजळ होणे तसेच खाज सुटणे याकडे दुर्लक्ष करू नका.
मधुमेही रुग्ण
अनेक डॉक्टर आणि संशोधनानुसार, मधुमेही रुग्णांना अनेकदा त्यांच्या पायात जळजळ जाणवते. अशा परिस्थितीत त्यांनी नक्कीच डॉक्टरांना भेटावे.
किडनीचा त्रास
तुम्हाला जर पायांच्या तळव्यांमध्ये नेहमी जळजळ होत असेल तर हे किडनीच्या आजाराचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
थायरॉईड
शरीरात थायरॉईडची पातळी कमी असल्यास हायपोथायरॉईडीझमची शक्यता असू शकते. पायात जळजळ देखील अशा वेळी होऊ शकते.
बी 12 ची कमतरता
जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल, तर तुमच्या पायाच्या तळव्यांमध्ये जळजळ निर्माण होऊ शकते. तसेच, जर तुम्ही अल्कोहोलचं सेवन केलं असेल तर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
हार्मोनल बदल
पायात जळजळ देखील अनेकदा हार्मोनल बदलांमुळे होते. अशा वेळी तुम्ही काही विशेष व्यायाम करू शकतात.
गवतावर अनवाणी चालणे
गवतावर चालण्याने तुमच्या पायांच्या तळव्यांत होणारी जळजळ कमी करता येऊ शकते. गवतावर चालल्याने झोप चांगली लागते. यामुळे तुमच्या पायाची सूजही कमी होते. याशिवाय गवतावर चालणे देखील मानसिक आरोग्यासाठी चांगले मानले जाते. याशिवाय गवतावर चालल्याने हृदयाच्या आरोग्यालाही फायदा होतो आणि डोळ्यांच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.
मेहंदी लावा
पायात जळजळ होत असेल तर तुम्ही मेहंदीचा उपाय करू शकता. मेहंदी गरम करून पायाला लावल्याने वेदना कमी होतात. तसेच, मेहंदी सर्दी आहे ज्यामुळे तुमच्या तळव्यांना जळजळ होते. जर तुम्हाला तुमच्या पायात थकवा जाणवत असेल तर मेहंदी लावल्याने तुमचा थकवा देखील बरा होतो.
हळदीचे पाणी उपयुक्त
जर तुम्ही तुमच्या पायांना ट्रेनिंग देत असाल तर तुम्ही हळदीच्या पाण्यात पाय भिजवून हे करू शकता. हळद कोरड्या त्वचेची समस्याही दूर करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :