![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Tips : 'या' 3 गोष्टी तुमची पचनक्रिया मजबूत करतात; बद्धकोष्ठता, अपचन आणि पोट दुखण्याची समस्या झटक्यात होईल दूर
Health Tips : अनहेल्दी फूड आणि बैठ्या जीवनशैलीमुळे गॅस, अॅसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासह पोटाचे अनेक आजार होऊ शकतात.
![Health Tips : 'या' 3 गोष्टी तुमची पचनक्रिया मजबूत करतात; बद्धकोष्ठता, अपचन आणि पोट दुखण्याची समस्या झटक्यात होईल दूर Health Tips eat these 3 foods to get rid of constipation acidity and bloating marathi news Health Tips : 'या' 3 गोष्टी तुमची पचनक्रिया मजबूत करतात; बद्धकोष्ठता, अपचन आणि पोट दुखण्याची समस्या झटक्यात होईल दूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/1e552a2dc1f78472734bab5855035d251705749083933358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health Tips : आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बैठी जीवनशैलीमुळे (Lifestyle) गॅस, अॅसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता (Constipation), पोट फुगणे यांसारख्या आजारांचं प्रमाण फार वेगाने वाढलं आहे. थंडीच्य दिवसांत तर आजाराचं प्रमाण आणखी वेगाने वाढतं. बहुतेकदा आजारांची सुरुवात पोटापासून होते. अशा वेळी जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल आणि पोट खराब असेल तर तुमचं आरोग्य लवकर बिघडू शकतं. अशा परिस्थितीत पोटाचे आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर या ठिकाणी आम्ही काही घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचं आरोग्या तसेच पोटाच्या विकारांपासून तुमचं संंरक्षण करू शकता.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि आहारतज्ञ रुजुता दिवेकर गुड हेल्थ सीझन 2 च्या सिक्रेट्समध्ये पोट निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय सांगतात. या उपायामध्ये तूप, गूळ आणि केळी या तीन गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. हा उपाय पचन सुधारण्यासाठी फार उपयुक्त आहे.
दुपारच्या वेळी गूळ आणि तूप खा
गुळ खाण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आपल्याला माहीतच आहेत. तुम्ही दुपारच्या जेवणात एक चमचा गूळ आणि तूप घालू शकता. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत होते. तूप शरीराला निरोगी फॅट प्रदान करते आणि गूळ तुमची साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.
केळ्याचं सेवन करा
केळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि सूज कमी होते. रोज सकाळी किंवा संध्याकाळी 4 ते 6 च्या दरम्यान केळ्यांचं सेवन करा. केळ्यामध्ये फायबर आणि इलेक्ट्रोलाईट्स असतात जे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या नियंत्रित करतात. तसेच, दह्यामध्ये 3-4 काळे मनुके खाल्ल्याने तुमची पचनशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच, यामुळे डोकेदुखी आणि ऍसिडिटीची समस्या दूर होते.
दिवसभर अॅक्टिव्ह राहा
निरोगी राहण्यासाठी दिवसातून किमान 30 मिनिटं चालणं गरजेचं आहे. यामुळे तुम्ही दिवसभर अॅक्टिव्ह राहता तसेच तुमची पचनक्रियाही चांगली राहते. तसेच, दुपारी 15-20 मिनिटांची झोप घेणे महत्वाचे आहे. निरोगी आरोग्यासाठी कॉफीचं सेवनही मर्यादित करा. कॉफीच्या अतिसेवनाने बद्धकोष्ठता किंवा अतिसार होऊ शकतो. यासाठी कॉफीचं सेवन शक्यतो कमी करा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)