Health Tips : दिवाळीत वाढणाऱ्या अपचनापासून होईल सुटका; 'या' डिटॉक्स ज्यूसने शरीराला मिळतील अनेक फायदे
Detox Juice For Diwali : सणासुदीच्या दिवसांत आपलं आपल्या खाण्यावर नियंत्रण राहत नाही आणि अनेक प्रकाच्या समस्या निर्माण होतात.
Weight Loss Detox Juices For Diwali : दिवाळीचा सण सुरु झाला आहे. या सणासुदीच्या दिवसांत आपलं आपल्या खाण्यावर नियंत्रण राहत नाही आणि अनेक प्रकाच्या समस्या निर्माण होतात. या पदार्थांचं सेवन केल्याने वजन तर वाढतंच पण त्याचबरोबर हे पदार्थ आरोग्यासाठीही हानिकारक ठरतात. अशा परिस्थितीत, काही टिप्स फॉलो करून आणि डिटॉक्स ज्यूस पिऊन तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. हे ज्युस कोणते ते जाणून घ्या.
भोपळ्याचा रस
भोपळ्याचा रस शरीराला डिटॉक्स करण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. याने दिवसाची सुरुवात करा आणि ज्यूस घेतल्यानंतर किमान दीड ते दोन तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका. हा रस तुम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ काचेच्या भांड्यात ठेवा. हा एक उत्कृष्ट डिटॉक्स रस आहे.
नारळ पाणी
नारळ पाणी हे निसर्गाकडून मिळालेले वरदान आहे. नारळ पाण्याचे फायदे सांगता येतील तेवढे कमीच आहे. तुम्ही नारळ पाण्याने तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता आणि त्यानंतर तासभर काहीही खाऊ नका. यामुळे शरीरातील टॉक्सिन्सही निघून जातात.
भाज्यांचा रस
जेव्हा रस आणि शरीराचे डिटॉक्सिफिकेशन येते तेव्हा फळांचा रस या उद्देशासाठी वापरला जात नाही. फक्त भाज्यांचा रस शरीराला डिटॉक्स करतो. तुम्ही दिवसातून दोनदा सहजपणे हा ज्सूस घेऊ शकता. तुम्ही बीट, गाजर, पालक, दुधी, टोमॅटो इत्यादींमधून हा ज्सूस तयार करू शकता. या ज्यूसमध्ये थोडं आलं घातल्यास याची चव आणखी वाढेल. तुम्ही त्यात थोडी काळी मिरी आणि सैंधव मीठ घालू शकता. ते प्यायल्यानंतर किमान एक ते दोन तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका.
डिटॉक्स पाणी
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही दिवसभर पिण्यासाठी आदल्या रात्री डिटॉक्स पाणी देखील तयार करू शकता. यासाठी एका मोठ्या भांड्यात अडीच ते तीन लिटर पाणी घेऊन त्यात पुदिन्याची पाने, काकडी आणि लिंबाचे तुकडे टाका. रात्रभर हे मिश्रण पाण्यात असेच राहू द्या. पुढच्या दिवसभरात जेव्हाही तहान लागेल तेव्हा हे पाणी प्या. याबरोबरच दिवसातून अनेक वेळा कोमट पाणी प्यावे. हर्बल टी किंवा ग्रीन टी घेत राहा. ग्रीन स्मूदी बनवून प्या. हे शरीर डिटॉक्स करतात आणि यामुळे पोटही भरलेलं राहतं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :