Health Tips : जास्त प्रथिनांचे सेवन केल्याने शरीराला होते 'हे' नुकसान; जाणून घ्या दिवसात किती प्रोटीन्स घ्यावेत?
Health Tips : प्रथिने शरीरातील पेशींची निर्मिती आणि देखभाल करण्यास मदत करतात.
Health Tips : आजकाल लोक बॉडीबिल्डिंग आणि फिटनेसकडे (Fitness Tips) लक्ष देत आहेत. यासाठी लोक जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळत आहेत. अशा परिस्थितीत, स्नायू लवकर वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी बरेच लोक उच्च प्रथिनयुक्त आहाराचा अवलंब करतात. परंतु जास्त प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्याने त्यांना त्यांचे आरोग्य बिघडवण्याचे परिणाम भोगावे लागू शकतात याची जाणीव बहुतेकांना नसते. प्रथिने शरीरातील पेशींची निर्मिती आणि देखभाल करण्यास मदत करतात. आपले स्नायू मजबूत ठेवणे महत्वाचे आहे परंतु असे म्हटले जाते की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानी करतो. दररोज किती ग्रॅम प्रथिने घ्यावीत आणि जास्त प्रमाणात घेतल्याने कोणते नुकसान होऊ शकते हे जाणून घेऊया.
दररोज किती प्रथिने घ्यावीत?
एक निरोगी व्यक्तीला दररोज त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम 0.8 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. उदाहरणार्थ, तुमचे वजन 60 किलो असल्यास, तुम्ही दररोज किमान 48 ग्रॅम (60 x 0.8) प्रथिने खावीत. तथापि, गर्भधारणेदरम्यान आणि बाळाच्या विकासादरम्यान प्रथिनांची आवश्यकता जास्त असू शकते. तसेच बॉडीबिल्डिंगमध्येही प्रोटीनचे सेवन वाढवता येते. पण लक्षात ठेवा, जास्त प्रमाणात प्रथिने खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
जास्त प्रथिने खाण्याचे तोटे
मूत्रपिंडावर दबाव पडतो
जेव्हा आपण प्रथिने जास्त प्रमाणात वापरतो, तेव्हा त्याचा आपल्या किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो. किडनीचे काम शरीरातून टाकाऊ आणि विषारी पदार्थ काढून टाकणे आहे.जेव्हा आपण जास्त प्रथिने खातो, तेव्हा किडनीला ते अतिरिक्त प्रोटीन देखील फिल्टर करावे लागते. यामुळे त्याच्यावर दबाव येतो आणि त्याला अधिक काम करावे लागते. असेच जास्त काळ चालू राहिल्यास किडनी कमकुवत होते.
हाडांचा कमकुवतपणा
अति प्रथिने शरीरात आम्लता वाढवते ज्यामुळे हाडांमधून कॅल्शियम बाहेर पडतो, यामुळे ऑस्टियोपोरोसिस किंवा हाड कमजोर होतात.
वजन वाढणे
अतिरिक्त प्रथिने शरीरात चरबीच्या रूपात जमा होतात आणि वजन वाढू शकते.अशाप्रकारे प्रथिने जास्त प्रमाणात घेतल्यास वजन वाढू शकते आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.
पचनाच्या समस्या
अति प्रथिनांमुळे पोट फुगणे, अतिसार, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. एखाद्याने जास्त प्रथिने घेणे टाळावे..
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.