(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : दररोज रिकाम्या पोटी ड्रायफ्रुट्स खाताय? तर, तुमच्यासाठी 'हे' जाणून घेणं गरजेचं
Health Tips : ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि चांगले असतात.
Health Tips : जर तुम्हाला तुमचा आहार चांगला ठेवायचा असेल. तर ड्रायफ्रूट्सशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही असे म्हटले जाते. कारण, ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर पोषक घटक असतात आणि ते खाण्याचे अनेक फायदे आहेत. असे बरेच लोक आहेत ज्यांना ड्रायफ्रूट्स भिजवल्यानंतर खायला आवडतात तर काहींना ते कच्चेच खायला आवडतात. आज या लेखाच्या माध्यमातून या संबंधित काही तथ्यांबद्दल सांगणार आहोत जे दररोज रिकाम्या पोटी ड्रायफ्रुट्स खातात त्यांना माहित असणे आवश्यक आहे.
जे दररोज ड्रायफ्रुट्स खातात त्यांनी हे जाणून घ्या
तुम्ही रोज किती ड्रायफ्रूट्स खात आहात?
ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यात उच्च कॅलरी आहे. त्यामुळे तुम्ही रोज किती खात आहात यावरून खूप फरक पडतो. कारण ड्रायफ्रूट्समुळे तुमचं वजनही वाढते. दररोज किमान 5 बदाम, 2-3 काजू, मनुणे, अक्रोड यांचं सेवन मर्यादित प्रमाणात असायला हवं.
भरपूर पोषक घटक असतात
ड्रायफ्रूट्समध्ये जीवनसत्त्व, लोह आणि भरपूर पोषक घटक असतात. पण ते नियंत्रणात खाणे खूप गरजेचे आहे. तसेच, जर तुम्ही असा विचार करत असाल की फक्त ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने, तुम्ही भाज्या आणि फळे खाल्ले नाहीत तरी चालतील तर तुम्ही चुकीचा विचार करताय. कारण तुमच्या आहारात फायबर आणि पोषक दोन्ही असणे अत्यंत आवश्यक आहे.
नैसर्गिक साखरेची पातळी जास्त असते
काही ड्रायफ्रूट्स आहेत ज्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. उदाहरणार्थ, मनुका आणि जर्दाळू यांसारख्या कोरड्या फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. ते जास्त खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
हायड्रेशन
मनुके पूर्णपणे कोरडे खाल्ले तर फार चांगले आहे. यामध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. आणि जास्त खाल्ल्याने कॅलरीज वाढतात. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी ते फार उपयुक्त आहेत.
फायबर
ड्रायफ्रूट्स हा फायबरचा चांगला स्रोत आहे, जो पचनास मदत करतो आणि तुम्हाला पोट भरून ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे मूठभर ड्रायफ्रूट्सचं सेवन करा. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील. ड्रायफ्रूट्स तुम्हाला अधिक काळ ऊर्जा देतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :