(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : हिवाळ्यात छातीत दुखणं हे हृदयविकाराचं लक्षण? वाचा आरोग्य तज्ज्ञांचं मत
Health Tips : हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका दुपटीने वाढतो.
Health Tips : उत्तर भारतात थंडीला सुरुवात झाली आहे. हिवाळा सुरु झाला की अनेक आजारांना देखील सुरुवात होऊ लागते. थंड हवामानात, वृद्ध लोक अनेकदा छातीत अस्वस्थतेची तक्रार करतात. जे कधी कधी खूप हानिकारक असते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की ही देखील हृदयविकाराच्या सुरुवातीची लक्षणे असू शकतात. काही तज्ज्ञ आणि संशोधकांना असे आढळून आले की, हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका दुपटीने वाढतो.
हिवाळ्यात याच कारणामुळे हृदयविकाराचा झटका येतो
हृदयविकाराचा झटका ज्याला मायोकार्डियल इन्फेक्शन देखील म्हणतात. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना योग्य रक्त मिळत नाही तेव्हा असे होते. जेव्हा बराच वेळ रक्त स्नायूंपर्यंत पोहोचत नाही, तेव्हा हृदयाच्या स्नायूंना इजा होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे (CVD) झालेल्या अंदाजे 1.79 कोटी मृत्यूंपैकी 85% हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे होते.
अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए)
अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) द्वारे केलेल्या अहवालानुसार, हिवाळ्यातील सुट्टीचा ऋतू वर्षातील इतर कोणत्याही वेळेपेक्षा हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंमध्ये अधिक योगदान देतो. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूची दुसरी सर्वाधिक संख्या 26 डिसेंबर रोजी होते आणि तिसरी सर्वाधिक संख्या 1 जानेवारी रोजी होते.
हिवाळ्यात जास्त हृदयविकाराचा झटका का येतो?
- हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे कोणतेही निश्चित कारण सापडलेले नाही. पण यामागचे सर्वात मोठे कारण थंड हवा असू शकते. या काळात रक्ताभिसरण कमी होऊ लागते आणि बीपी वाढतो. बीपी वाढल्यामुळे हृदयावर खूप दबाव येतो.
- हिवाळ्याची तुलना अनेकदा तणाव आणि भावनिक तणावाशी केली जाते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
- हिवाळ्यात, थंड हवेमुळे, लोक कमी बाहेर पडतात, ज्यामुळे इतर ऋतूंच्या तुलनेत शारीरिक क्रिया कमी होऊ लागतो. यामुळे वजन वाढते. आणि हृदयाचे आरोग्य बिघडू लागते.
- छातीत दुखणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.
- ब्राँकायटिस किंवा न्यूमोनियासारख्या संसर्गामुळे फुफ्फुसांना जळजळ होते, त्यामुळे छातीत दुखू शकते.
- छातीत असह्य वेदना होणे, अनेकदा डाव्या हाताला, मान किंवा जबड्यात ही वेदना पसरते
- धाप लागणे, छातीत घट्टपणा जाणवणे
- घाम येणे आणि हृदय धडधडणे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :