Health Tips | वजन कमी करण्यासाठी Kareena Kapoor Khan करते 'हे' उपाय
अभिनेत्री करीना कपूर खान हिनं कायमच प्रेक्षकांच्या ममनाचा ठाव घेतला आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या करीनानं तिच्या सौंदर्यासोबतच शारीरिक सुदृढतेकडेची तितकंच लक्ष दिलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान ही वयाच्या चाळीशीच्या टप्प्यावर असूनही तिच्या सौंदर्यावर मात्र याचा लवलेशही दिसत नाही आहे. मागील कित्येक वर्षांपासून ती कलाविश्वात सक्रीय आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या बेबोनं कायमच तिच्या सौंदर्यासोबत शारीरिक सुदृढतेलाही प्राधान्यस्थानी ठेवलं आहे. करीना नेमकं हे सारं निभावून कशी नेते हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन जातो.
मुख्य मुद्दा असतो तो म्हणजे गरोदरपणानंतरही तिनं नियंत्रणात ठेवलेल्या शरीरयष्ठीचा आणि वजनाचा. सहसा गरोदरपणानंतर झालेल्या काही शारीरिक बदलांचे थेट परिणाम हे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते. पण, करीना मात्र आला अपवाद ठरत आहे. कारण, तिनं काही गोष्टींचं काटेकोरपणे पालन केल्याचं म्हटलं जात आहे.
लेकीनं शेअर केला नीना गुप्ता, विवियन रिचर्ड्स यांचा Unseen Photo
काय आहे करीनाचा डाएट प्लान ?
- करीना तिच्या दिवसाची सुरुवात 9-10 भिजवलेले बदाम खाऊन करते. ज्यानंतर ती जीमला जाते.
- आहारामध्ये करीना पापड, दही, भात किंवा मग पनीरच्या भाजीचा समावेश करते.
- दुपारी 2 किंवा 3 वाजण्याच्या सुमारास ती लहानशी वाटी भरुन पपई, शेंगदाणे, पनीरचा तुकडा किंवा मग काही मखाणे खाणं पसंत करते.
- सायंकाळी 5-6 वाजण्याच्या सुमारास करीना मिल्कशेक पिण्यास पसंती देते.
- रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ती जेवण आटोपते. यामध्ये सहसा बूंदी रायता, पुदीना रोटी किंवा भाजी आणि भाताचा समावेश असतो.
- रात्री झोपण्यापूर्वी ती हळदीच्या दुधातून थोडं जायफळही घेते. जायफळ हे अतिशय आरोग्यदायी आहे. यामुळं वजन कमी होण्यासही मदत होते.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )