Health Tips : सिगारेट आणि दारूपेक्षाही 'या' सवयी तुमच्या आरोग्यासाठी घातक; वेळीच सोडा, अन्यथा मृत्यूचा धोका
Bad Health Habits : बराच वेळ बसणे आणि पडून राहणे ही आपल्या सवयींपैकी एक आहे, ज्यामुळे अकाली मृत्यू होऊ शकतो.
Bad Health Habits : चुकीची जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अनेक सवयींमुळे आरोग्याचं गंभीर नुकसान होते. त्यामुळे अनेक दिर्घकालीन आजारही झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळेच मधुमेह, हृदयविकार, जळजळ या आजारांनाही तरुण बळी पडत आहेत. वाईट सवयींपैकी, बराच वेळ बसणे हे सर्वात धोकादायक मानले जाते. ही सवय धूम्रपानापेक्षा जास्त घातक आहे. एकूणच आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो. जास्त वेळ बसण्याची सवय आरोग्यासाठी किती घातक आहे हे जाणून घेऊया.
जास्त वेळ बसण्याचे तोटे
आरोग्य तज्ञांच्या मते, शारीरिक हालचालींचा अभाव आरोग्यासाठी सर्वात धोकादायक आहे. जास्त वेळ बसल्याने ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते. तुम्ही दिवसभरात जितके जास्त वेळ बसाल तितके ते तुमच्या निरोगी आयुष्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे वजन वाढणे, मधुमेह आणि हृदयविकार होण्याचा धोका असतो. दिवसातून 6-8 तास सतत बसून राहिल्यास अकाली मृत्यूही होऊ शकतो.
अकाली मृत्यू होऊ शकतो
तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ बसणे किंवा बैठी जीवनशैली खूप हानिकारक असू शकते. हे समजून घेण्यासाठी संशोधकांनी 13 अभ्यास केले. ज्यामध्ये असे आढळून आले की, जे लोक कोणत्याही शारीरिक हालचालींशिवाय दिवसातून 8 तासांपेक्षा जास्त वेळ बसतात त्यांना लठ्ठपणा आणि अकाली मृत्यूस कारणीभूत आजारांचा धोका जास्त असतो. आरोग्य तज्ञ,
जास्त वेळ बसून राहण्याची सवय हे झपाट्याने वाढणाऱ्या आजारांचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते.
जास्त वेळ बसणे किंवा झोपणे धोकादायक का आहे?
अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की, सतत पडून राहिल्याने शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्याचप्रमाणे जे लोक जास्त वेळ बसतात त्यांना मधुमेहाचा धोका 112 टक्के जास्त असतो. त्यामुळे हृदयविकारही होऊ शकतात. हृदयविकार हा अशा आजारांपैकी एक आहे ज्यामुळे जगात सर्वाधिक मृत्यू होतात. जास्त वेळ बसल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे पुरुष आठवड्यातून 23 तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहत बसतात त्यांना हृदयरोग आणि मृत्यूचा धोका 64 टक्के जास्त असतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही 147 टक्क्यांनी वाढू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :