Health Tips : तुम्हाला अन्न गिळताना त्रास होतोय? वेळीच सावध व्हा; 'या' धोकादायक आजाराची लक्षणं असू शकतात
Achalasia Cardia : तुम्हाला जर अन्न गिळताना त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.समस्या गंभीर होण्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Achalasia Cardia : तुम्हालाही अन्न गिळण्यास अडचण येते का? जर तुमचं उत्तर हो असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. अन्न गिळण्यास त्रास होण्याची समस्या ही सामान्य नसून अत्यंत धोकादायक आजाराची लक्षणं असू शकतात. Achalasia Cardia हा असाच एक प्रकारचा आजार आहे. ज्यामध्ये अन्न गिळण्यास त्रास होतो. साधारणपणे 25 ते 70 वयोगटातील लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. या आजारामुळे अन्न गिळताना छातीत दुखते. काही लोकांना अन्न खाताना अचानक तीव्र खोकला येतो. या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास ही समस्या गंभीर बनू शकते. हा आजार नेमका काय आहे? चला जाणून घेऊया या आजाराबद्दल.
Achalasia Cardia आजार म्हणजे काय?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हा एक प्रकारचा अन्ननलिकेचा आजार आहे, ज्याचा परिणाम रुग्णाच्या संपूर्ण शरीरावर होतो. या आजारात खाणे-पिणे नीट होत नाही. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या वाढू लागतात. इतकंच नव्हे तर, या आजाराचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावरही होतो. आपलं वजनही झपाट्याने कमी होते. या सगळ्यांमागे एकच कारण आहे, ते म्हणजे नीट जेवण न मिळणे.
Achalasia Cardia ला पोटाचा आजार समजू नका
Achalasia Cardia या आजारामुळे अनेक वेळा पोटाच्या समस्या वाढतात. त्यामुळे अनेकांना हा पोटाशी संबंधित आजार आहे असे वाटू लागते. पण हा तुमचा गैरसमज आहे. हा आजार बराच काळ टिकून राहिल्यास आणि त्यावर उपचार न केल्यास तो कर्करोगाचे रूपही घेऊ शकतो. त्यामुळे जेव्हाही अन्न गिळताना त्रास होत असेल तेव्हा लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तसेच जर घशात अन्न गिळताना त्रास होत असेल तर अशा वेळी हलकाच आहार घ्यावा.
Achalasia Cardia निदान आणि उपचार कोणते करावेत?
आरोग्य तज्ञांच्या मते, Achalasia Cardia हा आजार ओळखण्यासाठी अप्पर जीआय एंडोस्कोपी केली जाते. या रोगाचा उपचार पीओईएम (पेरोरल एंडोस्कोपिक मायोटॉमी) प्रक्रियेद्वारे केला जातो. ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे. Achalasia Cardia आणि स्पास्टिक एसोफेजियल सारख्या रोगांमध्ये ते अधिक चांगले मानले जाते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : सकाळी गवतावर अनवाणी चालण्याने मिळतात 'हे' जबरदस्त फायदे; आजपासूनच चालायला सुरुवात करा























