एक्स्प्लोर

Health Tips : सकाळी गवतावर अनवाणी चालण्याने मिळतात 'हे' जबरदस्त फायदे; आजपासूनच चालायला सुरुवात करा

Walking Barefoot On Grass : सकाळी लवकर ताज्या हवेत हिरव्या गवतावर अनवाणी चालणे तुम्हाला खूप फायदे देऊ शकते.

Walking Barefoot On Grass : सकाळी लवकर चालणे आणि जॉगिंग करणे आरोग्यासाठी चांगले असते. यामुळेच लोक सकाळी जॉगिंग करताना दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का की पहाटेच्या वेळी ताज्या हवेत हिरव्या गवतावर अनवाणी चालणे किती फायदेशीर आहे. वास्तविक ही एक प्रकारची ग्रीन थेरपी आहे.ज्याचे पालन केल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. जाणून घेऊया पहाटे पहाटे हिरव्या गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे.

सकाळी गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे

1. जर तुम्ही सकाळी लवकर गवतावर अनवाणी चालत असाल तर तुम्हाला शांत झोप लागते. जर तुम्ही रोज सकाळी अर्धा तास अनवाणी मॉर्निंग वॉक करत असाल तर तुमच्या झोपण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल होतो.

2. गवतावर अनवाणी चालणे देखील तुम्हाला तणावापासून मुक्त करते. जेव्हा तुम्ही हिरव्यागार वातावरणात राहता तेव्हा तुम्हाला शांतता मिळते. त्यामुळे तुमचा मूड दिवसभर चांगला राहतो आणि मन सक्रिय होते.

3. हिरव्या गवतावर अनवाणी चालणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. जेव्हा तुम्ही हिरव्यागार वातावरणात श्वास घेता तेव्हा शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि तुम्हाला बरे वाटते.

4. नियमितपणे गवतावर अनवाणी चालण्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. तसेच हृदयविकारांपासून दूर राहण्यास मदत होते.

5. रक्तदाबाच्या समस्येतही गवतावर अनवाणी चालणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे अॅक्युपंक्चर पॉइंट खूप सक्रिय होतो आणि तुमचे संपूर्ण शरीर सक्रिय होते, जे निरोगी राहण्यास मदत करते.

6. रोज सकाळी गवतावर अनवाणी चालण्याने दृष्टी सुधारते. खरे तर चालताना तुमच्या शरीराचा संपूर्ण दबाव पायाच्या बोटांवर पडतो, त्यामुळे दृष्टी वाढते. हिरवळ डोळ्यांना आराम देते.

7. पाय दुखत असले तरी सकाळी लवकर हिरव्या गवतावर चालता येते. यामुळे पायांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात.

जर तुम्हालाही तुमच्या शरीरात हे सकारात्मक बदल हवे असतील तर आजपासूनच पहाटे पहाटे हिरव्या गवतावर चालायला सुरुवात करा. यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होतील आणि काही दिवसांतच सकारात्मक फरक तुम्हाला जाणवू लागतील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : वजन कमी करण्यापासून ते मधुमेह नियंत्रित करण्यापर्यंत 'ही' आहेत फायबरयुक्त फळं; आजच आहारात समावेश करा

महत्त्वाच्या बातम्या

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
Embed widget