एक्स्प्लोर

Sugar: अचानक साखर खायची बंद केलीत तर पहिले 2-3 दिवस शरिरात घडतात हे बदल

डायबिटिज किंवा हृदयाच्या निगडीत समस्या असतील तर, साखर खाणे टाळा असे अनेक तज्ज्ञ सांगतात.

Sugar consumption:वजन कमी करायचे असो वा मधूमेहाचा रुग्ण असो 'तुम्ही साखर सोडा' असा सल्ला हमखास आलाच म्हणून समजा. मग उद्यापासून साखर बंद अशी घोषणा करून अनेकजण अचानक साखर सोडतात आणि डोके दुखणे, थकल्यासारखं वाटू लागलं, अस्वस्थ वाटू लागले म्हणत गोडाचा एखादा पदार्थ हळूच तोंडातही जातो. तज्ञांच्या मते, अचानक कोणतीही गोष्ट सोडल्यानं शरिरात काही बदल घडतातच. त्या बदलांना पचवण्यासाठी शरिरालाही वेळ द्यावा लागतो. हीच गोष्ट सारखेच्या बाबतीतही लागू होते असं डॉक्टर सांगतात.

सकाळी उठल्यापासून आपल्या शरिराला साखरेची सवय असते. ही सवय मधुमेही, लठ्ठपणासह हृदयरोग्यांसाठीही घातकच असल्याचं सांगण्यात येतं. साखरेतील कर्बोदके हा आपल्या शरिरासाठी ऊर्जेचा स्रोत असला तरी आपल्या रक्तीतील सारखरेची पातळीही यानं वाढते. त्यात अनेकजण दुधातून साखर घेतात. चहा, कॉफीतही साखर असतेच. त्यामुळं अनावश्यक फॅट शरिरात साचू लागतात.  डायबिटिज किंवा हृदयाच्या निगडीत समस्या असतील तर, साखर खाणे टाळा असे अनेक तज्ज्ञ सांगतात. पण अचानक साखर सोडल्यानं शरिरात काही बदल दिसू शकतात. पहिले काही दिवस साखर सोडल्यानं उदासी, थकवा, डोकं दुखणं असे ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार बदल दिसू शकतात. 

अचानक साखर सोडल्यानं जाणवेल थकवा

अचानक साखर सोडली असेल तर अनेकांना पहिले दोन तीन दिवस थकवा जाणवल्याच्या तक्रारी येताना दिसतात. निरुत्साही आणि ऊर्जा नसल्यासारखेही वाटू शकते. अशा वेळी साखरेऐवजी फळं किंवा एखादा खजूर खाण्याचा सल्ला देण्यात येतो. 

अनेकांना डोकेदुखीचा होतो त्रास

दररोज साखर खाण्याची सवय असेल तर अनेकांना बारीक डोकेदुखीची कुरबुर जाणवते. सकाळचा चहा सोडल्यानंतरही अनेकांना हा त्रास होतो. जसे व्यायामाच्या पहिल्या दिवशी सगळे अंग दुखते तसाच हा त्रास असतो. जर साखरेचं अतिसेवन करत असाल तर अचानक साखर सोडल्यानं शरिराला हा बदल पचवणे जड जाते. यासाठी अचानक पूर्ण साखर बंद करण्यापेक्षा साखरेचं प्रमाण कमी करत करत हळूहळू साखर बंद केली तर नैसर्गिकरित्या शरिराला सारखेची कमतरता भरता येते. 

मूडस्विंग्स वाढतात

साखर अचानक बंद केल्यानं आपल्या मूडस्विंग्सवर परिणाम होतात. अनेकांना चिडचिड, उदास वाटणे असे वाटू शकते.

साखर बंद केल्यानं वजन होते कमी

साखर बंद केल्यानं शरिरात  कॅलरीजचे अनावश्यक प्रमाण घटून वजन कमी होते.
 साखर बंद केल्याचे दूरगामी चांगलेच परिणाम होतात असे तज्ञ सांगतात. त्यामुळे लठ्ठपणा किवा फॅटलॉस करायचा असेल तर साखरेचे सेवन न केल्यास लक्षणीय बदल दिसतात. 

रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रीत राहतं.

साखर बंद केल्यानं रक्तातील ग्लुकोजची पातळी झपाट्यानं कमी होते आणि त्यानंतर नियंत्रणात राहते. परिणामी दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget