Health: रोज चहा पिणाऱ्यांना हार्टअटॅकची भीती कमी! या अभ्यासात संशोधकांसमोर आली माहिती समोर, किती कप चहा प्यावा? तज्ञ म्हणाले..
Health: दर दुसऱ्या दिवशी चहा पिणं अपल्या हृदयासाठी चांगलं ठरतं असं आता तज्ञ म्हणू लागलेत. तुम्ही दिवसातून किती कप चहा पिता? किती प्यायला हवा? वाचा
Drnking Tea good for heart: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं थोडा जास्त चहा होतो, असं म्हणत प्रमाणापेक्षा जास्त चहा पिणारे अनेक आहेत. अनेकांना उठल्याउठल्या चहा लागतोच. ॲसिडीटी, जळजळ अशा कितीतरी आजारांना आमंत्रण देणारा चहा आपल्या शरिराला कधीकधी फायद्याचा आहे, असं म्हटलं तर! हार्वड हेल्थ मेडिकल स्कूलनं दिलेल्या अहवालानुसार जर तुम्ही नियमित चहा पित असाल तर हृदयाचे आरोग्य चांगले राहून हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
युरोपीयन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीने ९ जानेवारी रोजी ऑनलाईन प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार दर दुसऱ्या दिवशी चहा पिणं अपल्या हृदयासाठी चांगलं ठरतं.दीर्घकालीन आरोग्य तपासण्यासाठी एक लाखाहून अधिक जणांवर अभ्यास केला गेला. यात अधिक तीन कपपेक्षा कमी चहा पिणाऱ्यांच्या तुलनेत ज्यांनी जास्त चहा प्यायला त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा संबंधित समस्यांचा धोका २० टक्क्यांनी कमी आणि हृदयरोगाचा झटका येऊन मृत्यू होण्याचा धोका २२ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले.
असे कशाने झाले?
हिरवा आणि काळा चहा दोन्ही फ्लेव्होनॉइड्स नावाच्या संयुगे समृद्ध असतात जे हृदयविकाराचा धोका, सूज कमी करण्यास मदत करतात. चहा पिण्याचे कोलेस्ट्रॉल कमी होण्याशी आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्याशी देखील जोडले गेले आहे.चहामध्ये हृदयाला सुरक्षित ठेवणारी काही संयुगं आहेत, ज्यानं जळजळ आणि शरिरात खराब होणाऱ्या पेशींबरोबर लढणं, रक्तवाहिन्यांची चांगली कामगिरी यासाठी महत्वाचे ठरले आहेत. ग्रीन टीमधील संयुगे रक्तवाहिन्यांमधील गुठळ्यांना जोडलेले प्लेक्स तोडण्यास मदत करतात.
प्रमाणात चहा घेणं गरजेचं
चहामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पॉलीफेनॉल शरिरात दीर्घकाळ साठले जात नसल्यानं एका ठराविक काळापर्यंत चहा पिणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरू शकते. एक कप चहामध्ये ४७ मिलीग्रॅम तर ग्रीन अी मध्ये २८ मिलिग्रॅम कॅफिन असते. त्यामुळे अतिसेवनाने ॲसिडिटी, जळजळ, मळमळ असे त्रास होऊ शकतात. शिवाय चहात दुध आणि साखर टाकून उकळलेला चहा पित असाल तर या चहाने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास मदत होते, असेही अनेक तज्ञ सांगतात. त्यामुळे साखरयुक्त आणि कॅलरीयुक्त चहाने हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा प्रमाणात चहा पिण्याचा सल्ला तज्ञ देतात.
हेही वाचा:
Side effect of milk tea: रोज दुधासोबत चहा प्यायल्याने शरीरावर होतात असे परिणाम; जाणून घ्या!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )