Health Tips : उन्हाळ्यात कांदा खाण्याचे एक नाही, दोन नाही तर आहेत अनेक फायदे, कोणते ते जाणून घ्या
Health Tips : तुमच्या आहारात नेहमी कांद्याचा समावेश असावा. कारण यामुळे शरीराला मिळतात अनेक आश्चर्यकारक फायदे.
Health Tips : जर तुम्ही कांदा प्रेमी असाल तर कांदा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण कांद्यात कमी कॅलरीज आणि जास्त पोषक तत्वे आढळतात. दुसरीकडे, कांद्यामध्ये व्हिटॅमिन-बी, फोलेट (B9) आणि पायरिडोसिन (B6) पुरेशा प्रमाणात असते, जे तुमच्या शरीरातील चयापचय, मज्जातंतूंचे कार्य आणि लाल रक्तपेशी वाढवण्याचे काम करतात. पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, कार्बोहायड्रेट, सल्फर, प्रथिने आणि खनिजे यांचाही हा एक चांगला स्रोत आहे.
कांद्याचे फायदे (benefits of Onion) :
1- रक्तातील साखर चांगली राहते - कांद्याचे सेवन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते. एका संशोधनात असे दिसून आले की लाल कांद्याचे सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. तसेच, ते शरीरात हायपोग्लाइसेमिक तयार करतात जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहार पूरक म्हणून काम करू शकतात.
2 - शरीराला थंडावा मिळतो - कांद्याच्या कूलिंग इफेक्टमुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन केल्याने आपल्याला थंडावा मिळतो, उन्हाळ्यात शरीराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होते.
3 - उष्माघातापासून संरक्षण - उन्हाळ्यात उष्मा येण्याची शक्यता खूप जास्त असते, यामुळे तुम्ही गंभीर आजारी पडू शकता. अशा परिस्थितीत कांद्याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.कांद्यामध्ये पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ असतात, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवता येते, तर कांद्याचे सेवन केल्याने तुम्हाला उष्णता कमी वाटते.
4 - कॅन्सरची शक्यता कमी - कांदा आणि लसूण यांसारख्या एलिअम भाज्यांचे सेवन केल्याने कॅन्सर होण्याची शक्यता बर्याच प्रमाणात कमी होते. PubMed च्या संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक एलियम भाज्यांचे सेवन करतात ते कॅन्सरपासून लवकर बरे होऊ शकतात.
5 - कोलेस्टेरॉलची पातळी चांगली राहते - कांद्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स तुम्हाला जळजळीशी लढण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता खूप कमी होते. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha