Health benefits of Kabuli Chana : आरोग्यासाठी फायदेशीर आहेत काबुली चणे; जाणून घ्या याचे फायदे
kabuli chana : काबुली चणा जितका पौष्टिक आहे तितकाच तो खायलाही स्वादिष्ट आहे. त्यात प्रथिने आणि व्हिटॅमिन बी 6 चांगल्या प्रमाणात असतात.
Health benefits of kabuli chana : काबुली चणा जितका पौष्टिक आहे तितकाच तो खायलाही स्वादिष्ट आहे. त्यात प्रथिने आणि व्हिटॅमिन बी 6 चांगल्या प्रमाणात असतात. तसेच फोलेट, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांचा चांगला समावेश असतो. त्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबर देखील असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये असलेली प्रथिने स्नायू तयार करण्यास आणि पेशींचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. त्याच वेळी, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि कॅल्शियम हाडे मजबूत करतात. काबुली चण्यांचे फायदे नेमके कोणते आहेत ते जाणून घ्या.
काबुली चण्याचे फायदे :
1. काबुली चण्यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. जे बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अपचन यांसारख्या आतड्यांतील समस्यांपासून संरक्षण करते.
2. चणे लोहाचा खूप चांगला स्रोत आहे. याच्या सेवनाने अॅनिमियाची समस्या होत नाही.
3. चणे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
4. ते शरीरात नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. हे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवून किडनीमध्ये उपस्थित विषारी पदार्थ साफ करते.
5. हे भूक नियंत्रित करते आणि ते खाल्ल्यानंतरही एनर्जी लेव्हल जास्त राहते.
6. काबुली चण्यात असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
7. काबुली चण्यात प्रोटीन आणि आयरन मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळते. त्याचप्रमाणे काबुली चणे व्हिटॅमिन-ए, बी आणि ई देखील भरपूर प्रमाणात असतात, जे स्कॅल्प आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी काम करतात.
8. चणे अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे रजोनिवृत्तीनंतरची नकारात्मक लक्षणे नैसर्गिक पद्धतीने दूर करते.
9. चण्यामध्ये β-carotene नावाचे तत्व भरपूर असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
10. काबुली चण्याच्या सेवनाने तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बर्याच आजारांसोबतच हवामानातील बदलामुळे येणाऱ्या अनेक शारीरिक समस्यांपासूनही संरक्षण मिळते.
11. काबुली चण्यामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ असतो. जे लघवीच्या समस्येपासून बचाव करण्यास मदत करते.
12. काबुली चण्यामध्ये कॉपर आणि मॅंगनीज आढळतात. जे सतत रक्तप्रवाहात मदत करतात. ते खाल्ल्याने शरीराचे तापमान योग्य राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :