एक्स्प्लोर

तोंडातील जखमांकडे दुर्लक्ष ठरेल घातक; हेड-नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती? आजारावर कसे मात कराल?

Head and neck cancer symptoms: हेड अॅण्ड नेक कॅन्सरची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात.

Head and neck cancer symptoms: मुंबई - तोंडात किंवा घशामध्ये (Oral Cancer) झालेली जखम, गाठ किंवा आवाजात झालेला बदल याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र हीच लक्षणे हेड आणि नेक कॅन्सरची (Head and Neck cancer) सुरुवातीची लक्षणं असू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

भारतात सर्व कॅन्सर रुग्णांपैकी अंदाजे 26 % ते 30 % रुग्णांना हेड आणि नेक कॅन्सर असल्याची माहिती आहे. ज्याचे प्रमुख कारण तंबाखू, गुटखा, बीडी, सिगारेट आणि इतर सवयींशी संबंधित आहे. हे प्रमाण इतर कर्करोगांच्या तुलनेत अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) अंतर्गत IARC – Global Cancer Observatory नुसार, जगभरात सुमारे 9.3 ते 9.5 लाख नवीन हेड आणि नेक कॅन्सरची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात दरवर्षी सुमारे 10 ते 12 लाख नवीन कर्करोगाचे रुग्ण आढळतात. यापैकी जवळपास 30 टक्के कर्करोग हे हेड ॲण्ड नेक कर्करोगाचे असतात. तंबाखू, गुटखा, धूम्रपान, दारूचे व्यसन तसेच काही विषाणुजन्य संसर्ग ही या कॅन्सरची प्रमुख कारणं मानली जातात. विशेष म्हणजे हा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेल्यास पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अधिक असते.

तज्ज्ञांच्या मते, तोंडात तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरी न होणारी जखम, गालाच्या आत पांढरे किंवा लाल चट्टे, पाणी किंवा पदार्थ गिळताना त्रास होणे, सतत घसा दुखणे, मानेला गाठ येणे किंवा आवाजात बदल होणे ही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. याबाबत माहिती देताना डॉ. प्रथमेश पै (प्रमुख - हेड ॲण्ड नेक कॅन्सर विभाग, ग्लेनईगल्स हॅास्पीटल, मुंबई) म्हणाले, बहुतेक रुग्ण डॉक्टरांकडे येण्यास विलंब करतात. सुरुवातीच्या टप्प्यात आढळलेला हेड-नेक कॅन्सर 80 ते 90 टक्के प्रकरणांमध्ये यशस्वीरीत्या बरा होऊ शकतो. त्यामुळे तोंडातील कोणत्याही जखमेकडे दुर्लक्ष करु नका.

चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तनवीर अब्दुल मजीद यांनी तंबाखूच्या सवयींबाबत इशारा देताना सांगितले की,तंबाखू आणि दारूच्या व्यसनांमुळे हेड ॲण्ड नेक कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढतो. जनजागृती, नियमित तपासणी आणि सवयींमध्ये बदल हेच या कॅन्सरपासून संरक्षणाचे प्रभावी मार्ग आहेत.

हेड आणि नेक कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो, यासाठी योग्य जीवनशैली आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. तंबाखू, गुटखा, खैनी, मावा, सुपारी,बीडी आणि सिगारेटचे सेवन हे या कॅन्सरला कारणीभूत घटक आहे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे हा प्रतिबंधाचा पहिला आणि प्रभावी उपाय आहे. दारूचे सेवन पूर्णपणे बंद करणे, तंबाखू आणि दारू, सुपारी यांचा एकत्रितरित्या वापर हा हेड ॲण्ड नेक कॅन्सरचा धोका अनेक पटींनी वाढवतो, असेही डॉ. पै यांनी स्पष्ट केले.

मौखिक स्वच्छता राखणे आणि नियमित दंत तपासणी करून घेणे हेही प्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संतुलित आणि पोषक आहार, विशेषतः फळे व हिरव्या भाज्यांचा समावेश केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तोंडात किंवा घशात झालेली कोणतीही जखम, गाठ किंवा असामान्य बदल हे 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहिल. विशेषतः पुर्वी तंबाखू सेवन करत असलेल्या व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉ. तनवीर यांनी दिला आहे. 

जागतिक कर्करोग दिनानिमित्त तज्ज्ञांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कॅन्सरची भीती बाळगण्याऐवजी जागरूक राहावे, वेळेवर तपासणी करून घ्यावी आणि तंबाखूमुक्त जीवनशैली स्वीकारावी. लवकर निदान झाल्यास उपचार सुलभ होतात आणि रुग्णांचे जीवनमानही सुधारते.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
FSSAI School Food Guidelines : शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget