एक्स्प्लोर

Hair Care Tips : पार्लरसारखा हेअर स्पा आता घरच्या घरी करा; 1000 रुपयांऐवजी फक्त 250 रुपये मोजावे लागतील!

Hair Care Tips : 15 ते 20 दिवस हेअर स्पा करत राहिल्यास हळूहळू कोंड्याची समस्या तर दूर होईलच, त्याचबरोबर केसगळतीही कमी होईल.

Hair Care Tips : घनदाट आणि स्मूथ केसांसाठी (Hair Care Tips) आपण केसांची ट्रिटमेंट करतो. तसेच, केसांतील कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि टाळूवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी स्पा ट्रीटमेंट केली जाते. हिवाळ्यात तर स्पा ट्रिटमेंट करणं फार गरजेचं आहे कारण थंडीच्या दिवसांत केसांत कोंड्याची समस्या जास्त वाढते. त्यामुळे केसगळतीचा त्रास सुरु होतो. अशा वेळी पार्लरमध्ये जाऊन अवाढव्य पैसे खर्च करून हेअर स्पा करणं प्रत्येकाला परवडतंच असं नाही. याचसाठी आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येईल अशा सोप्या हेअर स्पाच्या टिप्स सांगणार आहोत.  

15 ते 20 दिवस हेअर स्पा करत राहिल्यास हळूहळू कोंड्याची समस्या तर दूर होईलच, त्याचबरोबर केसगळतीही कमी होते. हेअर स्पामुळे केस निरोगी तर होतातच शिवाय चमकदारही होतात. हेअर स्पा ही अशी एक ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये क्रीम, कंडिशनर आणि स्टीम इत्यादींनी केसांचे डीप कंडिशनिंग केले जाते. यासाठी घरच्या घरी हेअर स्पा कसा करायचा ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.

हेअर स्पा साठी कोणत्या वस्तू लागतील?

जर तुम्हाला घरच्या घरी हेअर स्पा करायचा असेल तर तुम्हाला शॅम्पू, स्पा क्रीम किंवा कंडिशनर, स्वच्छ टॉवेल आणि गरम पाण्याची आवश्यकता असेल. हेअर स्पा क्रीम बाजारात 270 ते 300 रुपयांना मिळते. ही क्रीम दोन ते तीन वेळा सहज वापरता येते. तर कंडिशनरची बॉटलही 100 रुपयांच्या आत येते. अशा प्रकारे, कमी पैशांत आणि परवडणाऱ्या किंमतीत तुम्ही सहजपणे हेअर स्पा घरी करू शकता.

घरी हेअर स्पा कसा करायचा?

  • सर्वात आधी, केस सौम्य शॅम्पूने धुवा, जेणेकरून टाळू आणि केसांवर साचलेली घाण साफ होईल.
  • आता आपले केस पुसून टाका आणि ते पूर्णपणे कोरडे होऊ द्या.
  • आता केसांना स्पा क्रीम लावा.
  • स्पा क्रीम लावल्यानंतर केस थोडे कोरडे होऊ द्या.
  • आता केसांची वाफ काढण्यासाठी एका मोठ्या पॅनमध्ये पाणी चांगले गरम करा.
  • टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि थोडासा पिळून केसांभोवती गुंडाळा.
  • केसांना टॉवेल गुंडाळण्याची प्रक्रिया दोन ते तीन वेळा पुन्हा करा म्हणजे वाफ व्यवस्थित लावता येईल.
  • टॉवेल खूप गरम किंवा खूप थंड नसावा याची काळजी घ्या. 
  • वाफवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, केस पाण्याने चांगले धुवा.

'हे' लक्षात ठेवा

जर तुम्ही केसांना स्पा क्रीम लावले असेल, तर वाफ घेतल्यावर कंडिशनर लावा आणि किमान दोन ते तीन मिनिटे केस धुवा. जर तुम्ही क्रीमऐवजी कंडिशनरने हेअर स्पा केला असेल, तर वाफ घेतल्यावर केस धुवा. आणि कोरडे करून विंचरा. 

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Hair Care Tips : केस स्ट्रेटनिंग आणि कलरिंगबद्दल डॉक्टरांचं म्हणणं काय? शरीराच्या 'या' अवयवांना कर्करोगाचा धोका

महत्त्वाच्या बातम्या

Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Embed widget