Hair Care Tips : केसांतून सतत कोंडा पडतोय? 'या' गोष्टींचा वापरून पाहा; 15 दिवसांतच फरक दिसेल
Hair Care Tips : कोंड्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी लिंबू हा एक उत्तम घरगुती उपाय आहे.
![Hair Care Tips : केसांतून सतत कोंडा पडतोय? 'या' गोष्टींचा वापरून पाहा; 15 दिवसांतच फरक दिसेल Hair Care Tips best home remedies to get rid of dandruff marathi news Hair Care Tips : केसांतून सतत कोंडा पडतोय? 'या' गोष्टींचा वापरून पाहा; 15 दिवसांतच फरक दिसेल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/30/ece5a5ec32715f2e239f0d3db77f26dd1703946572935358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hair Care Tips : हिवाळ्यात (Winter) त्वचेची आर्द्रता कमी होऊन कोरडेपणा (Dry Skin) वाढू लागतो. टाळूवर कोंडा (Dandruff) जमा होणे ही देखील कधीकधी डोकेदुखीची समस्या बनते. कोंड्याच्या समस्येची वेळीच काळजी घेतली नाही तर अनेकदा चारचौघांत लाजेचे कारण ठरू शकते. या कारणामुळे टाळूवर कोंड्याचा थर जमा होऊ लागतो. त्यामुळे केसांची मुळं कमकुवत होऊ लागतात आणि केस गळण्याची समस्या सुरू होते. कोंड्याची समस्या देखील बुरशीजन्य संसर्गास कारणीभूत ठरू शकते.
हिवाळ्यात अनेक वेळा कोंड्याची समस्या इतकी वाढते की ती डोक्यातून सतत कोंडा पडू लागतो आणि कपड्यांवरही दिसू लागतो. तुम्हालाही कोंड्याची समस्या असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा आणि काही घरगुती उपाय करून पाहू शकता. यामुळे तुम्हाला लवकरच चांगले परिणाम पाहायला मिळतील.
लिंबाचा रस
कोंड्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी लिंबू हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. लिंबाचा रस नारळ, ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीच्या तेलात मिसळून टाळूवर पूर्णपणे लावा. आणि साधारण एक ते दीड तासांनी केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करा. याशिवाय अर्ध्या लिंबाचा रस पाण्यात पिळून केस धुवा. याच्या मदतीने तुमचा कोंडा लवकरच दूर होईल.
ऍपल सायडर व्हिनेगर आणि मुलतानी माती
मुलतानी मातीचा वापर केस धुण्यासाठी फार पूर्वीपासून केला जातो. कोंडा दूर करण्यासाठी, मुलतानी माती अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये मिसळून केस धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करून पाहिल्यास कोंडा लवकर कमी होण्यास सुरुवात होईल.
कांद्याचा रस
अनेक केसांच्या तेलांमध्येही कांद्याचा रस वापरला जाऊ लागला आहे. डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी कांद्याचा रस लावा आणि केस धुण्याच्या एक किंवा अर्धा तास आधी टाळूची मालिश करा. यामुळे कोंडा तर दूर होईलच पण केसगळतीही हळूहळू कमी होईल.
'या' गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल तर रात्रभर केसांना तेल लावू नका. याबरोबरच केस धुण्याच्या एक तास आधी तेल लावा जेणेकरून टाळूवर ओलावा राहील. भरपूर पाणी प्या जेणेकरून त्वचा आतून हायड्रेट राहील. यानंतरही समस्या दूर होत नसल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : सेलिब्रेशननंतर थोडा हलका आणि निरोगी नाश्ता हवाय? 'ही' रेसिपी वापरून पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)