Health Care : उन्हाळ्यात हिरव्या बदामचा करा आहारात समावेश; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
उन्हाळ्यात हिरव्या रंगाचे बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात हिरव्या बदामाचे फायदे...
Health Care : उन्हाळ्यामध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. अनेक लोक रात्री बदाम भिजवून खातात. हिरव्या रंगाच्या बदामाचे देखईल तुम्ही आहारात समावेश करू शकता. रोज एक छोटी वाटी भरून हिरवे बदाम खावे. या बदामांमध्ये पोषक तत्वे असतात. उन्हाळ्यात हिरव्या रंगाचे बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात हिरव्या बदामाचे फायदे...
इम्यूनिटी वाढते
हिरवे बदाम खाल्यानं शरीरामधील इम्यूनिटी वाढते. तसेच हिरव्या बदामामध्ये अँटीऑक्सिडेंट देखील मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे बॉडी डिटॉक्स होते, तसेच शरीरामधील पीएच लेव्हल बॅलेन्स राहते.
हिरव्या बदामांचा आहारामध्ये समावेश केल्यानं ह्रदयाच्या संबंधित समस्या जाणवत नाहित. कारण यामध्ये फ्लेवोनोइड्स आणि बायोफ्लेवोनोइड्स असते. जे एक प्रकारचे सेंकडरी मेटाबोलाइट्स असते. ज्यामुळे शरीरामधील अँटीऑक्सिडेंट आणि ब्लड सेल्स वाढतात. त्यामुळे ह्रदयामधील ब्लॉकेज किंवा हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. हिरवे बदाम खाल्यानं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते.
मेटाबोलिजम वाढते
हिरवे बदाम खाल्यानं मेटाबोलिजम वाढते. तसेच गॅस आणि अॅसिडीटीची समस्या देखील जाणवत नाही. हिरव्या बदामामध्ये फॉस्फोरस असते. ज्यामुळे जात आणि हाडे मजबूत होतात. त्यामध्ये अँटी बॅक्टिरीयल गुण असतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
- Health Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
-
Health Tips : रात्री उशिरा जेवताय? वेळीच सावध व्हा; अन्यथा होऊ शकतात 'या' समस्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha