Friendship Day Travel : सुख आणखी काय असतं! येणारा Weekend मित्रांसाठी खास, रिमझिम पावसात मित्रांची साथ, 'ही' ठिकाणं ट्रीपसाठी Best
Friendship Day Travel : जर तुम्हाला फ्रेंडशिप डे स्पेशल बनवायचा असेल तर मित्रांसोबत ट्रीप प्लॅनिंग आलंच..तुमचा फ्रेंडशिप डे अविस्मरणीय बनवणारी ठिकाणे जाणून घ्या.
Friendship Day Travel : काय मग दोस्तांनो... फ्रेंडशिप डे येतोय...सोबत वीकेंड सुद्धा...काय प्लॅन मग? फ्रेंडशिप डे जवळ आला की, मित्रांच्या ग्रुपमधून एखाद्या मित्राच्या तोंडातून आपसूकच प्रश्न येतात. मग एकापेक्षा एक सरस असे प्लॅन बनतात.. पण त्यातील किती प्लॅन यशस्वी होतात..हे वेगळं सांगायची गरज नाही... नाही का? तसं पाहायला गेलं तर वर्षातील 365 दिवसही मैत्रीचे असतात. पण मैत्रीदिन हा वर्षातून एकदाच येतो. येणारा वीकेंड मित्रांसाठी खूप खास आहे. कारण या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यावेळी तो 4 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. जर तुम्हाला हा दिवस आणखी खास बनवायचा असेल, तर फ्रेंडशिप डेच्या दिवशी मित्रांसोबत सहलीचा प्लॅन करा आणि त्यांच्यासोबत मजा करा. तुमचा फ्रेंडशिप डे अविस्मरणीय बनवणारी ठिकाणे येथे जाणून घ्या...
गोवा
जर आपण मित्रांसोबत ट्रीपबद्दल बोललो, तर गोव्याचा उल्लेख नक्कीच होतो. इथल्या समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत मजा करणे हा एक उत्तम अनुभव असेल. याशिवाय गोव्यातील हिरवाई, पाण्याचे खेळ, धबधबे आदींचाही आनंद लुटता येईल.
कुर्ग
भारताचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे कुर्ग हे देखील अतिशय सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्ही मित्रांसोबत अविस्मरणीय निसर्गसौंदर्य, चहा, कॉफी आणि घनदाट जंगलांचा आनंद घेऊ शकता. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. कूर्गला कोडगू या नावानेही ओळखले जाते. एबी फॉल्स, मंडलपट्टी व्ह्यूपॉईंट, ब्रह्मगिरी शिखर, नामद्रोलिंग मठ आणि तांड्याडमोल शिखर यांसारखी अनेक ठिकाणे येथे पाहण्यासारखी आहेत.
उदयपूर
जर तुम्हाला पर्वतांना भेट द्यायची नसेल तर तुम्ही राजस्थानातील उदयपूरला जाऊ शकता. राजस्थानचे हे छोटे शहर खूप सुंदर आहे. ऑगस्ट महिन्यात इथलं वातावरण आल्हाददायक होतं. तलावांच्या या शहरात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. तुम्ही मित्रांसोबत ऐतिहासिक वाड्यांनाही भेट देऊ शकता.
नैनिताल-मसुरी
तुम्ही दिल्लीजवळ राहत असाल तर, वीकेंडला नैनिताल किंवा मसुरी वगैरे जाण्याचा प्लॅन करू शकता. डेहराडून मसुरीच्या आधी आहे, तुम्ही डेहराडून देखील एक्सप्लोर करू शकता. ही दोन्ही ठिकाणे भेट देण्यास अतिशय सुंदर आहेत. याशिवाय तुम्ही जयपूरलाही फिरायला जाऊ शकता.
महाबळेश्वर
जर तुम्ही मुंबई जवळ राहात असाल तर, तुम्ही महाबळेश्वरच्या निसर्गसौंदर्याची अनुभूती घेऊ शकता. हे एक हिल स्टेशन आहे जिथे ऑगस्टमध्ये हवामान खूप सुंदर असते. येथे तुम्ही बोटिंग आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्याबरोबरच नैसर्गिक सौंदर्याची प्रशंसा करू शकता. याशिवाय तुम्ही लोणावळा किंवा खंडाळा सारख्या ठिकाणीही जाऊ शकता.
हेही वाचा>>>
Friendship Day 2024 Wishes : 'रक्ताची नसूनही रक्तात भिनते ती 'मैत्री'!' फ्रेंडशिप डे येतोय, मित्रपरिवाराला शुभेच्छा संदेश पाठवून दिवस बनवा खास..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )