Friendship Day च्या तारखेवरून लोकांमध्ये संभ्रम! भारतात कधी साजरा केला जातो हा दिवस? गूगलवर सर्वाधिक सर्चिंग
Friendship Day 2024 : फ्रेंडशिप डेच्या तारखेबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्याबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी, लोक सतत Google वर सर्चिंग करत आहेत. मैत्रीचा हा दिवस भारतात कधी साजरा होणार? जाणून घ्या
Friendship Day 2024 : ही दोस्ती तुटायची नाय..! मित्र असावा वणव्यामध्ये गारव्यासाऱखा.. मैत्रीवर अनेक हृदयस्पर्शी गाणी, कविता आहेत, ज्या आपल्याला मित्र किंवा मैत्रिणींची आठवण करून देतात. हा दिवस मित्रांप्रती तुमचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, मैत्रीचा हा दिवस भारतात साजरा करण्यासाठी एक वेगळा दिवस निश्चित करण्यात आला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये 2024 वर्षातील फ्रेंडशिप डे कधी साजरा केला जाईल? याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. जाणून घ्या..
मैत्री साजरी करण्यासाठी भारतात कोणता खास दिवस निवडला आहे?
मैत्री हा एक असा शब्द आहे, ज्याला स्पष्ट करण्यासाठी इतर कोणत्याही शब्दाची गरज नाही. हे असे नाते आहे जे कोणत्याही स्वार्थ किंवा भेदभावाशिवाय जपले जाते. हे नातं आपण स्वतःसाठी निवडतो. मैत्रीचे हे नाते साजरे करण्यासाठी दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. बुधवारी 30 जुलै रोजी जगभरात अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस साजरा करण्यात आला, परंतु तुम्हाला माहिती आहे का? की भारतात मैत्री साजरी करण्यासाठी कोणता खास दिवस निवडला गेला आहे? जाणून घ्या..
गूगलवर सर्वाधिक सर्चिंग
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी लोक गूगलवर सतत 'फ्रेंडशिप डे' सर्च करत आहेत, त्यामुळे हा गुगलचा ट्रेंड बनला आहे. त्याचवेळी फ्रेंडशिप डे 30 जुलै की ऑगस्टमध्ये याबाबत काही लोक गोंधळलेले दिसत आहेत. याच कारणामुळे फ्रेंडशिप डे गुगल ट्रेंडवर आहे. यामुळेच, आज आम्ही तुम्हाला फ्रेंडशिप डे म्हणजे काय आणि तो का साजरा केला जातो हे सांगणार आहोत.. याचे कारण काय, कधी सुरू झाला दिवस आणि ऑगस्टमध्येच का साजरा केला जातो? जाणून घ्या..
फ्रेंडशिप डेच्या तारखेबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्याबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी, लोक सतत Google वर शोधत आहेत. जागरण वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत फ्रेंडशिप डे संदर्भात गुगलवर 50 हजारांहून अधिक सर्च केले गेले आहेत. तर लोक इंटरनेटवर याशी संबंधित अनेक गोष्टी शोधत आहेत. इतकंच नाही तर गेल्या काही तासांत या एका शब्दाच्या सर्चमध्ये 3950% वाढ झाली आहे.
फ्रेंडशिप डे नेमका कधी? लोक गोंधळात
आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाबाबत बरेच लोक संभ्रमात आहेत, ज्यामुळे बरेच लोक हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस आणि मैत्री दिवस यात काय फरक आहे. वरील आलेखावरून लोकांचा हा गोंधळ समजू शकतो. निळी रेषा आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे दर्शवते, तर लाल रंग फ्रेंडशिप डे दर्शवते. याशिवाय, गेल्या काही तासांत केवळ फ्रेंडशिप डेवर सर्चमध्ये वाढ झाली आहे.
भारतात सर्वाधिक सर्चिंग कुठे होतेय?
देशाच्या विविध भागांबद्दल बोलत असताना, भारतात सर्वात जास्त फ्रेंडशिप डे सर्चिंग कुठे होतेय? आकडेवारीनुसार, कर्नाटक आणि तामिळनाडूसह दक्षिण भारतात हा शब्द सर्वाधिक शोधला गेला आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि पुद्दुचेरीमध्येही लोक याचा खूप शोध घेत आहेत.
फ्रेंडशिप डे म्हणजे काय?
नावाप्रमाणेच, फ्रेंडशिप डे हा मित्रांना समर्पित केलेला खास दिवस आणि मैत्री साजरी करण्याचा एक प्रसंग आहे. हा दिवस तुमच्या मित्राप्रती तुमचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची तसेच त्यांची प्रशंसा करण्याची संधी आहे.
हा दिवस कधी आणि का साजरा केला जातो?
फ्रेंडशिप डे हा सर्वप्रथम हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक जॉयस हॉल यांनी सुरू केला. त्यांनी हा दिवस मैत्रीचा सन्मान आणि साजरा करण्यासाठी सुरू केला. नंतर त्याच्या कल्पनेचा इतर लोकांवरही प्रभाव पडला आणि त्यामुळे जागतिक स्तरावर त्याच्या उत्सवासाठी वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्यात आल्या. 2011 मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
हा दिवस भारतात कधी साजरा केला जातो?
हा दिवस साजरा करण्यासाठी 30 जुलै हा दिवस जरी UN ने निश्चित केला असला तरी भारतात हा दिवस दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. भारताशिवाय अमेरिका, भारत, बांगलादेश यांसारख्या अनेक देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. यावेळी भारतात 4 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे. तर, मेक्सिको, इक्वाडोर सारखे अनेक देश 14 फेब्रुवारीला मैत्री दिन साजरा करतात. सिंगापूरचे मूळ रहिवासी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात फ्रेंडशिप डे साजरा करतात.
फ्रेंडशिप डे भारतात ऑगस्टमध्येच का साजरा करतो?
ऑगस्टच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा करण्याबद्दल बोलायचे झाले तर असे म्हटले जाते की, 1935 मध्ये अमेरिकेत ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती, त्यानंतर त्या व्यक्तीच्या एका खास मित्राला ही घटना कळली या दुःखातून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर मैत्रीचे हे उदाहरण पाहून अमेरिकन सरकारने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर भारतासह इतर देशांमध्ये या दिवशी मैत्रीचा दिवस साजरा करण्याचा ट्रेंड सुरू झाला.
हेही वाचा>>>
Friendship Day Travel : 'फ्रेंडशिप डे' होईल स्पेशल, आठवणीत राहील दिवस! मित्रांसोबत 'या' ठिकाणी करा हॅंग आऊटचा प्लॅन, मित्र करेल कौतुक
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )