Friendship Day 2023 : फ्रेंडशीप डे साजरा करण्यासाठी 'ही' आहेत बेस्ट ठिकाणं
दाच्या फ्रेंडशिप डे (Friendship Day)ला कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करा. या खास प्रसंगी मित्रांसोबत प्रवास करणे आणि मजा करणे या गोष्टी तुमची मैत्री आणखी घट्ट करण्यासाठी करू शकतात.
Friendship Day 2023 : आयुष्यात मित्र असणे खूप महत्वाचे आहे. मित्र नसले तर आयुष्याचा प्रवास अपूर्ण वाटतो असं म्हणतात. म्हणूनच म्हणतात की, प्रत्येक मित्र महत्वाचा असतो. तो एकमेव मित्र असतो, ज्याच्यासोबत सर्व प्रकारच्या गोष्टी शेअर करता येतात. असं म्हणतात की खरा मित्र तोच असतो, जो तुमच्या कठीण प्रसंगी तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि तुमच्यासाठी प्रामाणिक असतो. पण आजच्या काळात खरे मित्र मिळणे खूप अवघड आहे. तर यंदाच्या फ्रेंडशिप डे (Friendship Day)ला कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करा. या खास प्रसंगी मित्रांसोबत प्रवास करणे आणि मजा करणे या गोष्टी तुमची मैत्री आणखी घट्ट करण्यासाठी करू शकतात. यंदाचा फ्रेंडशिप डे मजेदार आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी या काही ठिकाणांना (Places) आवर्जुन भेट द्या.
गोवा
मित्रांसोबत मज्जा करण्यासाठी गोवा हे सर्वोत्तम डेस्टिनेशन (Destination) आहे असं म्हटलं जातं. गोवा सनी बीचवर पावसाळ्यात वेगळाच अनुभव येतो. मित्रांसोबत येथे तुम्ही एन्जॉय करु शकता.
कुर्ग
कुर्ग या ठिकाणाला भारताचे स्कॉटलँड (Scotland) म्हणून ओळखले जाते. कर्नाटकातील कुर्ग हे कॉफीचे मळे, टेकड्या आणि धबधबे असलेले एक शांत हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. मित्रांसोबत येथे जाणे खरोखर एक अविस्मरणीय अनुभव देईल.
शिलाँग
हे चित्तथरारक धबधबे, हिरव्यागार टेकड्या आणि आल्हाददायक हवामानासाठी ओळखले जाते. पूर्वेचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण या ठिकाणी मित्रांसोबत फिरणे आणखीनच आनंददायी असेल.
महाबळेश्वर
महाबळेश्वर हे असे हिल स्टेशन आहे जिथे ऑगस्टमध्ये हवामान खूप सुंदर असते. येथे तुम्ही स्ट्रॉबेरी पिकिंग, बोटिंग (Boating), प्रेक्षणीय स्थळे पाहणे आणि सौंदर्याचा भरपूर आनंद घेऊ शकता.
उदयपूर, राजस्थान
राजस्थानच्या बहुतांश भागात कडक उष्ण असले तरी, ऑगस्टमध्ये उदयपूरमधील हवामान खूपच आल्हाददायक असते. तलावांच्या या शहरात, तुम्ही ऐतिहासिक राजवाड्यांना भेट देऊ शकता आणि बोट राईडचा आनंद घेऊ शकता.
अमृतसर
तुम्ही अमृतसरलाही भेट देऊ शकता. यासाठी रात्री उशिरा ट्रेन किंवा बसने निघावे लागेल. तिथे पोचल्यावर एक हॉटेल घ्या आणि थोडी विश्रांती घ्या. गोल्डन टेंपल बघायला जा, त्यानंतर वेळ राहिला तर वाघा बॉर्डरला देखील तुम्ही जाऊ शकता.
इतर महत्वाच्या बातम्या
Friendship Day 2023 : 'फ्रेंडशिप डे'ला मित्र-मैत्रिणींना द्या 'हे' परफेक्ट गिफ्ट