Food : रोज -रोज नाश्त्याला काय बनवू? असा प्रश्न पडत असेल, तर 3 सोप्या, झटपट होणाऱ्या रेसिपी जाणून घ्या
Food : अनेकदा सकाळी अनेक घरांमध्ये घाई दिसून येते. मुलांचे दुपारचे जेवण तयार करणे, संपूर्ण कुटुंबासाठी अन्न शिजवणे आणि नंतर सर्वांचे टिफिन पॅक करण्यात सकाळ निघून जाते.
Food : सकाळी उठल्याबरोबर घरात सर्वांचा एकच प्रश्न असतो, तो म्हणजे आज नाश्त्याला काय? हा प्रश्न विचारताच घरातील स्त्री किंवा जो कोणी स्वयंपाकघरात असेल त्याला सुद्धा प्रश्न पडतो की रोज रोज नाश्त्याला असं काय बनवायचं? पोहे, उपमा, शिरा, ईडली, डोसा आपण नेहमीच बनवतो. पण अशा काही वेगळ्या रेसिपी आहेत का? ज्या कमी वेळात झटपट बनतील आणि चवीलाही भारी असतील. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही रेसिपीबद्दल सांगत आहोत, ज्या तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे
रोज -रोज नाश्त्याला काय बनवू? असा प्रश्न पडत असेल तर या रेसिपी जाणून घ्या
अनेक घरातील लोक सकाळी घाईत असतात, कारण कामावर जाण्याची घाई, मुलांची शाळेत जायची घाई, सर्वकाही कसं वेळेवर झालं पाहिजे. त्यामुळे दररोज नाश्त्याबाबत संकोच आणि घाई असते. अशात सकाळी काय खावे, काय नाही याचा विचार करायलाही वेळ मिळत नाही. ही एक सामान्य समस्या आहे, जिचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. तुम्हालाही रोज -रोज नाश्त्याला काय बनवू? असा प्रश्न पडत असेल, तर 3 सोप्या रेसिपी जाणून घ्या..
सकाळच्या घाईत झटपट होणारे पदार्थ
अनेकदा सकाळी अनेक घरांमध्ये घाई दिसून येते. मुलांचे दुपारचे जेवण तयार करणे, संपूर्ण कुटुंबासाठी अन्न शिजवणे आणि नंतर सर्वांचे टिफिन पॅक करण्यात सकाळ निघून जाते. अशात वीकेंड किंवा सुट्टीच्या दिवशी जरा आराम मिळाला तर किचनमध्ये जाण्याचा आळस आणखी वाढू लागतो. अशावेळी एखादा सोपा पण आरोग्यदायी झटपट आयता पदार्थ उपलब्ध झाला असता तर आनंद द्विगुणित झाला असता असे वाटते. अशा लोकांसाठी, आम्ही अतिशय सोप्या नाश्त्याच्या रेसिपी घेऊन आलो आहोत. ज्या तयार होण्यास कमी वेळ लागेल आणि पौष्टिक आणि चवीलाही भारी असतील. सकाळच्या नाश्त्याच्या काही रेसिपी जाणून घेऊया-
रवा अप्पे
कढईत चणाडाळ, कढीपत्ता आणि मोहरी घाला. त्यात रवा घालून भाजून घ्या. भाजलेला रवा एका भांड्यात काढून थंड करा. त्यात दही आणि किसलेले गाजर घाला. मीठ घातल्यावर पाणी घालून पीठ तयार करा. एनो किंवा सोडा घालून मिक्स करा. ॲपे मोल्डला काही थेंब तेलाने ग्रीस करा आणि सर्व साच्यांमध्ये पीठ घाला आणि शिजवा. झटपट हेल्दी रवा अप्पे तयार आहे. शेंगदाणा किंवा नारळाच्या चटणीसोबत खा.
ओट्स चिला
ओट्स आणि रवा भाजून घ्या. बेसन, बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, गाजर, हिरवी मिरची आणि हिरवी कोथींबीर घाला. मीठ, जिरे आणि पाणी घालून मिक्स करा. या मिश्रणाने तव्यावर चीला तयार करा. पौष्टिक ओट्स चीला तयार आहे. रायत्या सोबत एन्जॉय करा.
आलू पराठा बाइट्स
बटाटे उकळून त्यात हिरवी मिरची, हिरवी कोथींबीर, आले, मीठ घालून मॅश करा आणि बटाट्याच्या पराठ्यासाठी मिश्रण तयार करा. कणकेचा गोळा घेऊन पोळीसारखा लाटून घ्या. त्यात हे मिश्रण पसरून संपूर्ण पोळीवर पसरवा. नंतर पोळी पूर्णपणे लाटून गुंडाळा. आलू पराठा रोल चाकूने तुकडे करा. एक एक करून लहान तुकडे घ्या आणि आपल्या हातांनी सपाट करा. तव्यावर बेक करा आणि क्रिस्पी आलू पराठा बाइट्स तयार आहेत.
हेही वाचा >>>
Health : उन्हाळ्यात कॉफी पिणाऱ्यांनो सावधान! डिहायड्रेशन...निद्रानाश..हृदयविकार अन् बऱ्याच आजाराचा धोका
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )