(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Father's Day 2024 : वडील-मुलाचं नातं आणखी बहरेल, जिव्हाळा राहील! फक्त हे उपाय जाणून घ्या, कधीही मतभेद होणार नाहीत
Father's Day 2024 : फादर्स डेच्या निमित्ताने वडील आणि मुलाचे नाते घट्ट करण्यासाठी, तसेच त्यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी काही उपाय सुचवले जात आहेत. जाणून घ्या..
Father's Day 2024 : आपण अनेकदा पाहतो, वडिल-मुलाचं नातं अनोखं असतं, कधी त्यांच्यात मतभेद होतात, तर कधी घट्ट जिव्हाळा दिसून येतो. बहुतेक कुटुंबात आई आपल्या मुलांच्या चुका पोटात घालते, ती माऊली प्रेमळ मनाची असते, तर वडील कठोर स्वभावाचे असतात. आई आपल्या मुलाला प्रेमाने आणि वडील शिस्तीच्या मार्गाने योग्य मार्ग दाखवतात. यामुळे अनेकदा असे होते की, वडील-मुलगा एकमेकांसमोर आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करत नाही आणि एकमेकांच्या वागण्यावर नाखूश राहतात. अशात त्यांच्यातील वाढते अंतर आणि मतभेद योग्य वेळी थांबवले पाहिजेत. यंदा 16 जून रोजी फादर्स डे साजरा केला जात आहे. फादर्स डेच्या निमित्ताने वडील आणि मुलाचे नाते घट्ट करण्यासाठी, तसेच त्यांच्यातील दुरावा कमी करण्यासाठी काही उपाय सुचवले जात आहेत. जाणून घ्या..
वैचारिक मतभेदांमुळे वडिलांसोबतचं नातं अनेकदा तणावपूर्ण बनते.
पालकांना नेहमी आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता असते. आपलं मुल चुकीच्या मार्गावर जाऊ नये आणि चांगली व्यक्ती बनावी, यासाठी अनेक वेळा वडील कठोर बनतात. मग वाढत्या वयानुसार मूल, विशेषतः मुलगा, बंडखोर होऊ लागतो. त्याला त्याच्या विचार आणि आवडीनुसार जगायचे असते. अशा परिस्थितीत मुलगा आणि वडील यांच्यात अनेकदा मतभेद होतात. मुलगा तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवत असताना, वैचारिक मतभेदांमुळे वडिलांसोबतचे नाते अनेकदा तणावपूर्ण बनते. अशा परिस्थितीत वडील आणि मुलामध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो.
वडील आणि मुलामध्ये वाद होण्याची कारणे
वडील आणि मुलामध्ये वाद होण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यातील पहिली कारण म्हणजे जनरेशन गॅप. वयातील फरकामुळे त्यांच्यात अंतर निर्माण होऊ शकते.
बहुतेक कुटुंबात आई प्रेमळ असते आणि वडील कठोर स्वभावाचे असतात. यामुळे पिता-पुत्र एकमेकांसमोर आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाहीत आणि एकमेकांच्या वागण्यावर नाखूष राहतात.
वडील आणि मुलगा दोघेही पुरुष आहेत, म्हणून त्यांचा एकत्रित अहंकार संबंध खराब करू शकतो.
वडील आपल्या मुलासाठी स्वप्न पाहतात. आपल्या मुलाने आपली स्वप्ने पूर्ण करावी अशी अपेक्षा करतात, काही वेळेस मुलाच्या स्वतःच्या वेगवेगळ्या योजना असू शकतात. वडिलांच्या अपेक्षा पूर्ण न करणे हे देखील त्यांच्यातील वादाचे कारण बनू शकते.
संबंध कसे सुधारायचे?
पिता-पुत्रात झालेल्या मतभेदाचे कारण. तसेच त्यांच्यातील वादाचे कारण काय आहे हे समजल्यावर ते सहज सोडवता येते.
वडील आणि मुलामध्ये कोणत्याही मुद्द्यावर मतभेद असल्यास किंवा ते एकमेकांच्या विचारांशी सहमत नसल्यास अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा, जेणेकरून वाद वाढण्यापासून रोखता येईल.
वाद वाढण्यामागे भाषा हे एक कारण आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी लोक अनेकदा इतरांना दुखावणारे शब्द निवडतात. त्यामुळे रागाच्या भरात काहीही बोलू नका.
जर वडील आणि मुलाचे नाते सुधारायचे असेल तर त्यांनी एक नियम केला पाहिजे की त्यांच्यात कितीही फरक असला तरीही ते एकमेकांशी बोलणे सोडणार नाहीत. राग शांत झाल्यावर शांत मनाने बोला.
हेही वाचा>>>
Father's Day 2024 : फादर्स डे येतोय! वडिलांना सरप्राईझ द्यायचंय? भारतातील या 3 ठिकाणी घेऊन जा अन् आनंद अनुभवा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )