Father's Day 2024 : 'बाबा..तुजविण जग आहे शून्य!' फादर्स डे निमित्त 'हे' हृदयस्पर्शी मेसेज, कविता वडिलांना समर्पित करा
Father's Day 2024 : हा दिवस म्हणजे मुलांसाठी त्यांच्या वडिलांबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी आहे. फादर्स डे निमित्त 'हे' हृदयस्पर्शी मेसेज, कविता वडिलांना समर्पित करा
![Father's Day 2024 : 'बाबा..तुजविण जग आहे शून्य!' फादर्स डे निमित्त 'हे' हृदयस्पर्शी मेसेज, कविता वडिलांना समर्पित करा Fathers Day 2024 lifestyle marathi news Dedicate this heartwarming messages poem to father on Fathers Day Father's Day 2024 : 'बाबा..तुजविण जग आहे शून्य!' फादर्स डे निमित्त 'हे' हृदयस्पर्शी मेसेज, कविता वडिलांना समर्पित करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/6dfe3c9017a94186889b22a68be232a81718433107713381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Father's Day 2024 : आपल्या आयुष्यात आई-वडिलांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आई वडिल आपल्या मुलांसाठी जे काही करतात, त्याचे परतफेड करता येणं अशक्य आहे. भारतात दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदा 2024 मध्ये, ते 16 जून रोजी साजरा केला जाईल. हा दिवस म्हणजे मुलांसाठी त्यांच्या वडिलांबद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी आहे. हा दिवस वडिलांचा सन्मान करण्यासाठी आणि वडील-मुलगी किंवा पिता-पुत्र यांच्यातील विशेष नातेसंबंधासाठी समर्पित आहे. या दिवशी मुलं आपल्या वडिलांना शुभेच्छा पत्र, भेटवस्तू, अभिनंदन संदेश आणि कविता पाठवून त्यांच्या वडिलांना त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची आठवण करून देतात. या प्रसंगी तुम्ही या कविता तुमच्या वडिलांना समर्पित करू शकता. तुम्हाला तुमच्या वडिलांसोबत फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा!
फादर्स डे निमित्त करण्यासाठी कविता
स्वत: साधा मोबाईल वापरुन,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो,
तुमच्या प्रीपेडचे पैसै स्वत: भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी जो आसुसलला असतो
तो बाप असतो, हॅपी फादर्स डे!
ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला,
तरी समोरच्या संकटांना,
लढा देण्याची प्रेरणा मिळते,
अशा माझ्या बाबांना, हॅपी फादर्स डे!
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती,
जी तुम्हाला जवळ घेते, जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते,जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते, जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते,जेव्हा तुम्ही हरता,
हॅपी फादर्स डे!
ज्या माणसामुळे तुम्हाला दुनिया ही कळली,
त्याच माणसामुळे तुम्ही आयुष्याची अनेक वळण पाहिली,
कधीही सोडली नाही त्याने तुमची साथ,
कारण बाप असतोच जीवनाचा आधार,
पितृदिनाच्या शुभेच्छा!
बाबा, तुम्ही आहात म्हणून
माझ्या अस्तित्वाला उपकारांची झालर आहे,
माझ्या यशाची चमक जेव्हा मला
तुमच्या डोळ्यात दिसते,
तेव्हा मी भरुन पावतो,
अशा माझ्या बापमाणसाला हॅपी फादर्स डे!
शोधून मिळत नाही पुण्य,
सेवार्थाने व्हावे लागते धन्य,
कोण आहे तुझविणं अन्य?
‘बाबा’
तुजविण माझं जग आहे शून्य, हॅपी फादर्स डे!
माझ्या आयुष्यात जी श्रीमंती आहे,
ती केवळ तुमच्यामुळे आहे,
माझ्या जगण्याला अर्थ आहे,
तो केवळ तुमच्यामुळे आहे,
माझे जे अस्तित्व आहे ते केवळ तुमच्यामुळे आहे,
माझे संपूर्ण आयुष्य केवळ तुमच्या सेवेसाठीच आहे,
हॅपी फादर्स डे!
काय हो बाबा इतक्या अडचणी आल्या,
तरी तुम्हाला मी काही रडताना पाहिले नाही,
कधीही ढासळून आमची साथ तुम्ही कधीही सोडली नाही,
घेऊन जबाबदाऱ्या तुम्ही झालात आमच्या जीवनाचे
बापमाणूस,
तुमच्या स्तुतीलाही आज शब्द अपुरे काय सांगू आज, हॅपी फादर्स डे!
फादर्स डे निमित्त मेसेज
आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा
एकमेव देवमाणूस म्हणजे वडील
हॅपी फादर्स डे!
बाबांचा मला कळलेला अर्थ...
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर,
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून,
मुलांसाठी झटणारं अंतःकरण...
जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!
कधी शांत तर कधी रागीट,
कधी प्रेमळ तर कधी कठोर,
कधीही व्यक्त न होणाऱ्या माझ्या बहूरुपी बाबास
पितृदिनाच्या खूप शुभेच्छा!
कधी खिसा रिकामा असला तरी
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही
वडिलांसारखा मनाने श्रीमंत
मी दुसरं कोणाला पाहिलं नाही
हॅपी फादर्स डे!
जो व्यक्ती तुम्हाला विजेता बनवण्यासाठी आयुष्यभर कष्ट करत राहतो तो म्हणजे बाप असतो!
जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!
मला सावलीत बसवून
स्वतः जळत राहिले
असे एक देवदूत
मी वडिलांच्या रुपात पाहिले
वडिलांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा>>>
Father's Day 2024 : आजपर्यंत तुमच्या इच्छा वडिलांनी पूर्ण केल्या, आता तुमची वेळ! फादर्स डे बनवा खास, या ठिकाणांना भेट द्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)