Father's Day 2022 : 'या' अनोख्या भेटवस्तू देऊन वडिलांना शुभेच्छा द्या; 'फादर्स डे' होईल खास
Father's Day 2022 : 19 जूनला जगभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. तुम्हालाही तुमच्या वडिलांना काय गिफ्ट देऊ असा प्रश्न पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही ऑप्शन्स सुचवू शकतो.
Father's Day 2022 : ज्याप्रमाणे मदर्स डे, ब्रदर्स डे, सिस्टर्स डे साजरा केला जातो त्याप्रमाणेच पाश्चात्या संस्कृतीतून आलेला 'फादर्स डे' (Father's Day 2022) हा देखील तितकाच प्रचलित आहे. अनेक देशांत फादर्स डे च्या दिवशी खास सुट्टी दिली जाते. भारतात मात्र या दिवशी सुट्टी दिली जात नाही. मात्र वडिलांना स्पेशल फिल करून देणारा हा दिवस तरूणाई मात्र आवडीने साजरा करताना दिसते.
खरंतर आई आणि वडील हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याप्रमाणे आईची जागा कोणी घेऊ शकत नाही त्याप्रमाणे वडिलांची जागाही कोणी घेऊ शकत नाही. याच निमित्ताने 19 जूनला जगभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. तुम्हालाही तुमच्या वडिलांना काय गिफ्ट देऊ असा प्रश्न पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही ऑप्शन्स सुचवू शकतो. चला तर जाणून घेऊयात फादर्स डे स्पेशल गिफ्ट.
1. स्मार्टफोन
तुम्ही तुमच्या वडिलांना छानसा बजेट फ्रेंडली स्मार्टफोनसुद्धा गिफ्ट करू शकता. अगदी 5 हजार ते 15 हजारांपर्यंत एखादा आकर्षक स्मार्टफोन देऊन तुम्ही वडिलांना खुश करू शकता. पण, स्मार्टफोन निवडताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की हा स्मार्टफोन मोठ्या स्क्रिनचा असावा तसेच त्यामध्ये जास्त मेमरी स्टोरेज असावे. त्यामुळे स्मार्टफोन हा एक उत्तम पर्याय आहे.
2. स्मार्टवॉच
सध्या फिटनेस वॉचची क्रेझ आहे. ट्रेंडिंग गिफ्टमध्ये वॉच ला जास्त मागणी आहे. आणि घड्याळ ही वस्तू रोजच्या वापरातली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुमच्या वडिलांना असे वॉच द्या जे त्यांच्या नेहमीच स्मरणात राहील.
3. कपडे
वडिलांसाठी खास गिफ्टमध्ये शर्ट हा देखील सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला वडिलांची चॉईस, त्यांच्या आवडीचा रंग माहित असणे आवश्यक आहे. एकदा का तुम्हाला वडिलांची चॉईस कळली तर तुमचं गिफ्ट पाहून वडिल नक्कीच खुश होतील.
4. वडिलांशी संवाद साधा
आपल्या प्रिय व्यक्तीला अनेक भेटवस्तू देऊन तर सगळेच खुश करतात. पण या गिफ्टपेक्षाही आई-वडिलांसाठी सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे आपल्या मुलाने-मुलीने आपल्याला वेळ देणं. त्यांच्याशी संवाद साधणं. कोणत्याच वडिलांसाठी यापेक्षा मोठं गिफ्ट नसेल. अनेकदा आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्या घरच्यांशी संवाद साधणं कमी होतं. त्यामुळे या फादर्स डे ला कुटुंबाला चांगला वेळ द्या आणि संवाद साधा.
5. फिरायला घेऊन जा
प्रत्येकासाठी कुटुंब हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे या फादर्स डे निमित्त तुमच्या कुटुंबाला वेळ द्या आणि एखाद्या छानशा ठिकाणी फिरायला घेऊन जा. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल.
महत्वाच्या बातम्या :