Fashion : चिंब भिजलेले...रुप सजलेले...! पावसाळ्यात 'या' रंगांचे कपडे घाला, रंग आणि फॅब्रिकची 'अशी' घ्या काळजी
Fashion : ज्याप्रमाणे आपण उन्हाळ्यात कपडे घालताना रंग आणि फॅब्रिकची काळजी घेतो, त्याचप्रमाणे पावसाळ्यातही त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Fashion : देशात काही ठिकाणी उन्हाचे चटके बसत आहेत. तर काही ठिकाणी पावसाच्या आगमनाची चाहूल लागत आहे. म्हणजे काही भागात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. पावसाच्या आगमनाने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच्या सरी महाराष्ट्रात कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागावने स्पष्ट केलंय. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना पावसानुसार कपडे घालणे आवडते. ज्याप्रमाणे आपण उन्हाळ्यात कपडे घालताना रंग आणि फॅब्रिकची काळजी घेतो, त्याचप्रमाणे पावसाळ्यातही त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
'या' कपड्यांमुळे संसर्ग होऊ शकतो
पावसाळा ऋतूत नायलॉन, सॅटिन, पॉलिस्टर मिक्स, सिंथेटिक आणि मखमलीपासून बनवलेल्या कपड्यांमुळे संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत शरीरावर कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांच्यापासून दूर राहावे. आज आम्ही तुम्हाला काही रंगांबद्दल देखील सांगणार आहोत, जे तुम्ही पावसात बिनधास्तपणे परिधान करू शकता. पावसाळ्यात तुम्हाला कम्फर्टेबल वाटावे म्हणून या ऋतूत कपडे घालताना रंगांची विशेष काळजी घ्या.
पांढरा रंग
पावसाळ्यात पांढरा रंग तुम्ही आरामात परिधान करू शकता. हे घातल्यानंतर तुम्हाला दमट उष्णतेपासून आराम मिळेल. ते परिधान करताना, लक्षात ठेवा की त्याचे फॅब्रिक इतके हलके नसावे की पावसात भिजल्यावर ते पारदर्शक होईल.
हलका पिवळा रंग
लोकांना उन्हाळ्यात तसेच पावसाळ्यात हलक्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही पावसाळ्यातही हलका पिवळा रंग परिधान करू शकता. या रंगात फ्लोरल प्रिंटचे कपडे घातले तर तेही सुंदर दिसेल.
आकाशी निळा
आकाशी निळ्या रंगाचे कपडे तुम्हाला पावसात फ्रेश दिसण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला थंडावाही मिळतो.
गुलाबी
पावसाळ्यात तुम्ही गुलाबी रंग घालू शकता, जो मुलींचा आवडता रंग आहे. त्यामुळे डोळ्यांनाही खूप आराम मिळतो.
या रंगांपासून दूर रहा
उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळ्यातही खूप दमट होतो. अशा परिस्थितीत उष्णतेपासून दूर राहायचे असेल तर मरून, काळा, नेव्ही ब्लू, गडद हिरवा असे कपडे घालणे टाळा.
हेही वाचा>>>
Fashion : 'दिसशी तू नवतरुणी काश्मिरी..!' साडी नेसून सुंदर दिसालच, पण 'या' हेअरस्टाईलने लागतील चारचांद!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )