Fashion : लांब कुर्ती, कमाल रंगसंगती! 'हे' सलवार-सूट तुम्हाला देतील फॅन्सी लुक, दिसाल स्टायलिश
Fashion : सलवार-सूटला स्टायलिश लुक देण्यासाठी विविध रंगसंगती आणि शरीरा साईझनुसार डिझाइन निवडणे महत्त्वाचे आहे.
Fashion : तरुणींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सलवार सूट (Salwar-Suit) म्हणजे सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. महिलांना सलवार-सूट घालणे आवडते, कारण ते खूपच कंफर्टेबल असतात. कार्यक्रम कोणताही असो, लग्न असो, की कोणाचा साखरपुडा, किंवा सणवार.. सलवार-सूटची क्रेझ कधीच कमी होणारी नाही. असे हे ऑल टाईम फेवरेट सलवार सूट कोणत्याही सीझनमध्ये घालता येतात, फक्त त्याला उत्तम रंगसंगतीची जोड दिली, की ते अधिक खुलून दिसतात. सलवार-सूटचे आपल्याला विविध प्रकारचे डिझाइन्स बाजारात पाहायला मिळतील. आजकाल रेडीमेड स्टायलिश सूटही बाजारात मिळतात. सलवार-सूटला स्टायलिश लुक देण्यासाठी अनेक गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
सलवार सूटमध्ये स्टायलिश लूक
स्टायलिश लूकबद्दल बोलायचे झाले तर आजकाल फ्लोअर लेन्थ सूट्स म्हणजेच लांब कुर्तींना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. तर, आज आम्ही तुम्हाला लांब सलवार सूटचे काही नवीन डिझाइन्स दाखवणार आहोत आणि त्यांना स्टाइल करण्याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत
काळ्या रंगाचा सलवार सूट
जर तुम्हाला ग्लॅमरस आणि बोल्ड रंगांमध्ये पारंपारिक लूक स्टाईल करायचा असेल तर तुम्ही सोनेरी आणि काळ्या रंगाचे सूट घालू शकता. हा सुंदर सूट डिझायनर ITRH ऑफिशियलने डिझाइन केला आहे. या प्रकारचा सूट तुम्हाला जवळपास 3,000 रुपयांना बाजारात सहज मिळेल.
टीप: या प्रकारच्या सूटसोबत तुम्ही सोनेरी झुमकी घालू शकता.
फॅन्सी सूट डिझाइन
सिक्वेन्स वर्क आणि हलके रंग सध्या ट्रेंडमध्ये आहेत. हा सुंदर सूट डिझायनर ब्रँड सुई धागा लेडी श्वेता यांनी डिझाइन केला आहे. तुम्हाला असे सूट रेडीमेड सुमारे 4,000 रुपयांना सहज मिळू शकतात. यामध्ये तुम्ही उत्तम सिक्विन डिझाइन असलेला सूट निवडा.
टीप: या प्रकारच्या सूटसह, आपण आपल्या केसांसाठी कर्ल हेअर स्टाईल निवडू शकता.
हेवी नेट वर्क सूट डिझाइन
पांढऱ्या रंगासह गोल्डन वर्क अधिक सुंदर लुक देण्यास मदत करते. या सुंदर सूटचे डिझायनर Z बाय एम यांच्याकडून डिझाइन करण्यात आला आहे साधारण 5000 रुपयांमध्ये तुम्ही असे रेडीमेड सूट सहज मिळवू शकता.
टीप: या प्रकारच्या लुकसह हिरव्या रंगाचे दागिने स्टाइल करा.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Summer Fashion : फ्लोरल, प्रिंटेड कि प्लेन? उन्हाळ्यात कोणते ड्रेस दिसतील बेस्ट? निवडा डिझाईन, दिसा स्टायलिश!