Fashion : क्या खूब लगती होSS उन्हाळ्यात लग्नात वजनाने हलक्या, दिसायला भारी 'या' साड्या नेसाल तर, अभिनेत्रीप्रमाणे दिसाल!
Fashion : या लेखात आम्ही तुम्हाला उन्हाळा ऋतुत लग्नांमध्ये कोणत्या प्रकारच्या हलक्या वजनाच्या साड्या नेसता येतील याची माहिती दिली आहे.
Fashion : साड्या म्हटलं तर काही महिला अगदी जीव ओवाळून टाकतात राव..! साड्या म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय.. अशा अनेक महिला आहेत ज्यांना लग्न समारंभात साडी नेसणे आवडते. लग्नाव्यतिरिक्त अनेक खास प्रसंगीही साडी नेसली जाते, पण उन्हाळ्यात लग्नात जड साडी नेसणे खूप अवघड काम असते. जर तुम्ही लग्नात साडी नेसण्याचा विचार करत असाल तर या लेखात आम्ही सांगितलेल्या या सर्वोत्तम आणि हलक्या साड्या निवडू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही साड्यांचे डिझाईन्स दाखवणार आहोत, जे उन्हाळी हंगामातील लग्नात घालण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात.
सॅटिन साडी
भर उन्हाळ्यात लग्न आहे गं..साडी कोणती नेसू हा प्रश्न पडलाय.. असे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील तर चिंता करू नका. उन्हाळ्यात घालण्यासाठी सॅटिनची साडी हा उत्तम पर्याय असू शकतो. ही साटीन साडी मल्टी कलरमध्ये आहे. या प्रकारची साडी तुम्ही हाफ किंवा स्लीव्हलेस ब्लाउजसोबत नेसू शकता. या साडीसोबत तुम्ही मॅचिंग सोन्याचे झुमके आणि इतर दागिने घालू शकता. या साडीसोबत तुम्ही हील्स किंवा जुटी देखील घालू शकता. या साडीवर तुम्ही तुमचे केस मोकळे स्टाईल करू शकता.
कॉटन साडी
जर तुम्हाला सिंपल लूक हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारची कॉटन साडी घालू शकता. ही साडी खूपच हलकी आहे आणि त्यामुळे ही साडी उन्हाळ्यातील लग्नात घालण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. तुम्ही या प्रकारची साडी स्लीव्हलेस ब्लाउजसोबत घालू शकता आणि या साडीशी मॅच करून हेवी किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी देखील घालू शकता. या प्रकारच्या साडीमध्ये तुम्ही खूप आकर्षक दिसाल आणि तुम्ही गर्दीतूनही वेगळे व्हाल.
लिनन कॉटन साडी
जर तुम्हाला रॉयल लुक हवा असेल आणि स्टायलिशही दिसायचे असेल तर, तुम्ही अशा प्रकारची लिनन कॉटन साडी घालू शकता. ही तागाची सुती साडी उन्हाळ्याच्या मोसमात होणाऱ्या विवाहसोहळ्यांना घालण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. या साडीला खूप सुंदर बॉर्डर आहे आणि त्यामुळेच ही साडी खूप सुंदर दिसते. अशा प्रकारची साडी तुम्ही कमीतकमी दागिन्यांसह घालू शकता. तुम्हाला या प्रकारची लिनेन कॉटन साडी अनेक पर्यायांमध्ये मिळेल, जी तुम्ही उन्हाळ्यात घालू शकता.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Fashion : लाखात एक.. दिसतेस भारी! परफेक्ट पार्टी लुक हवाय? सलवार-सूटचे हे फॅन्सी डिझाईन्स, जाणून घ्या