Eye Care Tips : हिवाळ्यात डोळ्यांत पाणी का येतं? हा कोणता आजार तर नव्हे? वाचा तज्ज्ञांचं म्हणणं
Eye Care Tips : डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील भाग आहे. त्याची काळजी घेणे देखील आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.
![Eye Care Tips : हिवाळ्यात डोळ्यांत पाणी का येतं? हा कोणता आजार तर नव्हे? वाचा तज्ज्ञांचं म्हणणं Eye Care Tips why some people get watery eyes in winter marathi news Eye Care Tips : हिवाळ्यात डोळ्यांत पाणी का येतं? हा कोणता आजार तर नव्हे? वाचा तज्ज्ञांचं म्हणणं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/19/f76b5de5a2ec15ae40cc0d412b1a98911705668810465358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Eye Care Tips : डोळे पाणावलेले असणं हे चांगलं लक्षण आहे. पण, जर डोळ्यांतून (Eye Care Tips) वारंवार आणि जास्त पाणी येत असेल तर हे मात्र चिंतेचं कारण असू शकतं. खरंतर, डोळ्यांतून (Eyes) पाणी येते तेव्हा ते चांगले मानले जाते कारण अशा वेळी आपले डोळे बाहेरील धुळीच्या प्रदूषणापासून आपलं संरक्षण करतात आणि डोळ्यांना ओलावाही देतात. ही संपूर्ण प्रक्रिया डोळ्यांमध्ये असलेल्या अश्रू ग्रंथीद्वारे केली जाते. अश्रू ग्रंथी डोळ्यांसाठी ढाल म्हणून काम करतात. खरंतर, अश्रु ग्रंथी डोळ्यांना ओलावा देतात. यामुळे आपल्या डोळ्यांतून वारंवार पाणी येते. लॅक्लिमल ग्लॅंड हा आपल्या डोळ्यांना एक प्रकारे सुरक्षा प्रदान करणारा आहे. अशा वेळी डोळ्यांत पाणी नेमकं का येतं? आणि कोरड्या डोळ्यांची लक्षणं कोणती? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
डोळ्यांत पाणी येणं सामान्य आहे का?
काही लोक अतिशय थंड वातावरणात गेले की, त्यांच्या डोळ्यांत पाणी येऊ लागतं. खरंतर, थंड हवेमुळे डोळे कोरडे होतात आणि डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी, अश्रू निर्माण करण्यासाठी मेंदूला सिग्नल पाठविला जातो. हिवाळ्यात कोरड्या डोळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी या पद्धतीचा वापर करा. हिवाळ्यात डोळ्यांत पाणी येणे सामान्य आहे. पण, जेव्हा जेव्हा तापमानात घट होते आणि डोळ्यांत पाणी येते तेव्हा तुम्ही काही टिप्स वापरू शकता.
1. थंड वातावरणात स्वतःला झाकून ठेवा
2. आवश्यक नसल्यास किमान थंड वातावरणात बाहेर जा.
3. बाहेर जाण्यापूर्वी गॉगल किंवा सनग्लासेसचा वापर करा
4. केमिकल फ्री आय ड्रॉप्स वापरा
5. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गुलाब पाण्याचे काही थेंब डोळ्यांत टाकू शकता.
कोरड्या डोळ्यांची लक्षणे
संशोधनात असे अनेकदा आढळून आले आहे की, बहुतेक लोक कोरड्या डोळ्यांच्या समस्येने त्रस्त आहेत. पण, त्यांना याची जाणीव देखील नाही. डोळ्यांतून पाणी येणं हे अगदी सामान्य आहे हे लोकांना वाटतं. तुमचे डोळे कोरडे असल्यास तुम्हाला या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
1. डोळ्यांना खाज सुटणे आणि जळजळ होणे
2. प्रकाशामुळे डोळ्यांना अस्वस्थता वाटणे
3. डोळ्यांत थकवा जाणवणे
4. सतत डोकेदुखीचा त्रास होणे
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)