(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eye Care Tips : वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि खाज सुटतेय? मग 'या' पद्धतींनी डोळ्यांची काळजी घ्या
Eye Care Tips : प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, घसादुखी, फुफ्फुसाचे आजार अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
Eye Care Tips : दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे (Air Pollution) आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, घसादुखी, फुफ्फुसाचे आजार अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. डोळ्यांत (Eyes) पाणी येणे, लालसरपणा येणे, सूज येणे किंवा खाज येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वाढत्या प्रदूषणादरम्यान डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांची काळजी कशी घेऊ शकता याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
डोळे स्वच्छ पाण्याने धुवा
प्रदूषणामुळे (Pollution) डोळ्यांत धूळ साचू शकते. त्यामुळे डोळ्यांत जळजळ किंवा खाज सुटू शकते. त्यामुळे रोज स्वच्छ पाण्याने डोळे धुवा. म्हणजेच डोळ्यांमध्ये जमा झालेली धूळ आणि घाण साफ करता येईल.
अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श करू नका
आपण ज्याला स्पर्श करतो त्यावरील जंतू आणि धूळ आपल्या हातावर येते. हात स्वच्छ न करता डोळ्यांना स्पर्श केल्यास संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे साबणाने हात स्वच्छ धुवा आणि सॅनिटायझरचा वापर करा.
डोळे चोळू नका
डोळे चोळल्यामुळे डोळे कोरडे आणि लालसर होण्याचा धोका असतो. त्यामुळे डोळे चोळणे टाळा. तसेच, प्रदूषणामुळे जमा झालेली धूळ आणि घाण कॉर्नियाला नुकसान पोहोचवू शकते.
Eye Drops वापरा
प्रदूषणामुळे डोळे कोरडे होऊ शकतात. म्हणून, तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर वापरू शकता. Eye Drops हे तुमच्या डोळ्यांना आर्द्रता पुरवते. यामुळे डोळे कोरडेही राहत नाहीत. शिवाय, यामुळे संसर्गाचा धोकाही कमी होतो.
सनग्लासेस वापरा
प्रदूषण टाळण्यासाठी, बाहेर जाताना मास्क किंवा स्कार्फ वापरा जेणेकरून फुफ्फु सुरक्षित राहतील. त्याचप्रमाणे बाहेर जाताना डोळ्यांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी सनग्लासेस वापरा. हे तुमच्या डोळ्यांना अतिनील किरणांपासून तसेच धुळीपासून वाचवू शकते. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.
डॉक्टरांशी संपर्क साधा
डोळ्यांची कोणतीही समस्या असल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. वेळेत उपचार न केल्यास समस्या वाढू शकते. त्यामुळे डोळ्यांच्या कोणत्याही समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :