एक्स्प्लोर

केसगळती थांबवण्यासाठी योग्य मसाज कशी कराल, त्याचे फायदे काय ?

Hair Growth : वाढतं प्रदूषण, आहार, चुकीची जीवनशैली याचा परिणाम केसांवरही होतो. केसांची वाढ खुंटते, (Hair loss) त्याशिवाय केसांशी संबंधित समस्याही वाढतात. केसांसाठी अनेकजण महागडे उपाय (hair fall solution) करतात, किंवा उत्पादनावरही खर्च करतात.

​Easy head Massage That Can Increase Your Hair Growth : वाढतं प्रदूषण, आहार, चुकीची जीवनशैली याचा परिणाम केसांवरही होतो. केसांची वाढ खुंटते, (Hair Loss) त्याशिवाय केसांशी संबंधित समस्याही वाढतात. केसांसाठी अनेकजण महागडे उपाय (Hair fall solution) करतात, किंवा उत्पादनावरही खर्च करतात.. पण केसांच्या वाढीसाठी (hair growth) टाळूचा योग्य मसाज करणं, हाही उत्तम उपाय आहेत. मसाज केल्यामुळे फक्त आरामच मिळत नाही तर टाळूमधील रक्ताभिसरणही व्यवस्थित होते.  व्यवस्थित मसाज (Head Massage) केल्यानंतर तुमच्या केसांना आतून पोषण मिळतेच शिवाय केसांची वाढदेखील झपाट्याने होईल. जर तुम्हाला तुमचे केस लवकर वाढवायचे असतील, तर केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता.

केसांच्या वाढीसाठी नैसर्गिकरित्या उपाय फायदेशीर ठरतील. त्यासाठी टाळूची मालिश करणं हा उत्तम पर्याय आहे. त्यासाठी वैज्ञानिक कारणेही आहेत. त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप उपाय जाणून घेऊयात.  हेड मसाज केल्यानंतर केसांची वाढ कशी होऊ शकते? त्यासाठी वैज्ञानिक कारणेही आहेत. आपण थोडक्यात त्याबाबत जाणून घेऊयात...  

Improved blood circulation रक्ताभिसरण सुधारतं -

डोक्याचं व्यवस्थित मसाज केल्यानंतर टाळूतील रक्ताभिसरण सुधारतं. त्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा सुनिश्चित होतो. रक्ताभिसरणामुळे केसांचं एकूणच आरोग्य सुधारतं.

Reduced stress levels ताण-तणाव कमी होतो - 

ताण-तणावामुळे केसगळती मोठ्या प्रमाणावर होते. हेड मसाज केल्यामुळे आराम मिळतो आणि स्ट्रेसही कमी होतो. ताण-तणाव कमी झाल्यामुळे केसगळतीचं प्रमाण कमी होतं. हेड मसाज केल्यामुळे ताण तणाव कमी होतो, त्यामुळे केसांच्या समस्यांचा प्रभाव कमी होतो. 

Activation of hair follicles 

डोक्याची मसाज केल्यामुळे केसांच्या मूळाची सुप्त हालचाली होते. त्याशिवाय केसगळती कमी होते. मसाज केल्यामुळे केसांची मूळं वाढ होण्यास मदत होते. केसांच्या वाढीसाठीसाठी  मसाज महत्वाची भूमिका बजावते. 

हेड मसाज कसं कराल ? Step-by-step guide to an easy head massage 

1. आरामदायक जागा - Create a relaxing environment

हेड मसाज करणाऱ्यासाठी शांत आणि आरामदायक जागा महत्वाची आहे. त्यामुळे हेड मसाज करण्याआधी तुम्हाला शांत, आरामदायक जागा पाहावी लागेल. रिलॅक्स मूड होण्यासाठी व्यवस्थित ठिकाण महत्वाचं. त्याशिवाय आवडते गाण्यानेही तुमचा मूड सेट होईल. 

2. योग्य त्या तेलाची निवड करा - Choose a nourishing oil 

खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल अथवा जोजोबा तेल यासारखे केसांसाठी अनुकूल असणाऱ्या तेलाची निवड करा. तेल फक्त हेड मसाज करण्यासाठीच महत्वाचं नाही तर त्यामुळे टाळूला आराम मिळतो. केसांची मूळं सक्रीय होतात. त्यामुळे मसाज करण्यासाठी योग्य त्या तेलाची निवड करा.  

3. मंद आचेवर तेल गरम करा Warm The Oil 

तुम्ही निवडेलेल्या तेलाला मंद आचेवर कोमट होईपर्यंत गरम करा.. तेल जास्त गरम झाली नाही, याची खात्री करा.. तेल नॉर्मल गरम करा. जास्त तेल गरम केल्यास डोक्याला जखम होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या. 

4. Section Your Hair 

हेड मसाज अधिक व्यवस्थित होण्यासाठी तेल व्यवस्थित टाळूवर लावा...  हळू हळू तेल केसांच्या मध्ये लावून व्यवस्थित मसाज करा. जास्त केस असल्यास दोन विभागात तेल लावावे, खासकरुन महिलांनी केसांचं योग्य विभाजन करुन टाळूवर तेल लावून मसाज करावी.  

5. मसाजसाठी व्यवस्थित तेल लावा Apply The Oil 

बोटांवर थोडेसे तेल घ्यावं. त्यानंतर मानेपासून मसाज करण्यास सुरुवात करावी. हळू हळू टाळूपर्यंत तेल लावावे. डोक्यावर सर्व ठिकाण एकसमान तेल लावावे. 

6. आरामात मसाज सुरु करा Begin Massaging 

डोक्यात तेल व्यवस्थित लावल्यानंतर बोटांनी हळू हळू मसाज सुरु करावी. अतिशय हलक्या हातांनी टाळूची मालिश करावी. संपूर्ण टाळूवर हलक्या पद्धतीने मसाज करावी. ज्या ठिकाणी जास्त प्रमाण केस गळण्याचं प्रमाण आहे, त्या ठिकाणी जास्त लक्ष द्यावं.  त्या ठिकाणी थोडा अधिक भार देऊन मसाज करावी, जेणेकरुन केसांच्या मुळापर्यंत तेल जाईल, अन् केसगळती होण्याचं प्रमाण कमी होईल.

7. दहा ते 15 मिनिटांपर्यंत मसाज Massage for 10-15 Minutes 

छानशी गाणी, आरामदायक आणि शांत खोलीमध्ये दहा ते 15 मिनिटं मसाज करा. टाळूवर हळूवारपणे बोटांनी मसाज करा. जास्त त्रास होईल, इतकेही टाळूवर दबाव टाकू नका. शांतपणे जितकं सहन होईल, तितकं बोटांनी प्रेशर देत हळूवार मसाज करा. 

08. अर्धा तास आराम करा -  

हेडमसाज पूर्ण झाल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत शांत बसून राहा.. तोपर्यंत शांत डोळे मिटून गाणी ऐका... अर्ध्या तासांनी शाम्पूने केस व्यवस्थित धूवून घ्या. 

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

आणखी वाचा :

Health Tips: मनुके आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, पण कोणत्या रंगाचे खावेत माहितीय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारणMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | Superfast News | 17 January 2025ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 17 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
Embed widget