Health Tips: सारखं गरम पाणी पिताय? जाणून घ्या काय होईल नुकसान
Side Effects Of Hot Water: हिवाळ्यात (Winter) अनेक लोक गरम पाणी पितात, काहींना दररोज सकाळी गरम पाणी प्यायची सवय असते.
Side Effects Of Hot Water: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या शरीरात 70% पाणी असते. त्यामुळे पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात. हिवाळ्यात (Winter) अनेक लोक गरम पाणी पितात, काहींना सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायची सवय असते. खोकला झाला किंवा सर्दी झाली तर काही लोक गरम पाणी पितात. जास्त गरम पाणी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
1. किडनीवर होणारा परिणाम-
किडनीमध्ये कॅपिलरी सिस्टिम असते. जी शरीरातील पाणी आणि टॉक्सिन्स शरीराच्या बाहेर काढते. एका रिसर्चनुसार जास्त गरम पाणी प्यायल्याने किडनीच्या नॉर्मल फंक्शनवर परिणाम होतो.
2. रक्ताच्या प्रमाणावर परिणाम-
जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताच्या प्रमाणावरही परिणाम होतो. खूप गरम पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि इतर अनेक कार्डिओ समस्या जाणवू शकतात.
3. नसांना सूज येऊ शकते-
सतत गरम पाणी प्यायल्याने नसांना सूज येऊ शकते. तसेच डोकेदुखीची समस्या देखील तुम्हाला जाणवू शकते. त्यामुळे जास्त गरम पाणी पिणे टाळावे.
सकाळी आणि दुपारी किती पाणी प्यावे?
सकाळी उठल्यानंतर 3 ग्लास पाणी प्यावे. रोज याच प्रमाणात पाणी प्या. जेवल्यानंतर 2 तासानंतर पाणी प्यायले पाहिजे. तसेच पाणी पिल्यानंतर 45 मिनीटांनंतर नाश्ता करावा. त्या आधी काहीही खाऊ नये. पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Tea Side Effects: दिवसातून चार कप चहा पिताय? तर सावधान, होऊ शकतं नुकसान
Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )