(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Diabetes Food : मधुमेहाने त्रस्त असाल, तर ‘या’ गोष्टी आहारात नक्की सामील करा!
Diabetes Care Tips : तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची (Manage Blood Sugar Level) असेल, तर तुमच्या आहाराचे व्यवस्थापन करणे देखील महत्त्वाचे आहे.
Diabetes Care : भारतात सर्व वयोगटातील लोक मधुमेहाने (Diabetes) त्रस्त आहेत. अस्वस्थ आहार आणि व्यस्त जीवनशैलीमुळे या आजाराचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. मधुमेह हे इतर अनेक आजारांचे मूळ कारण आहे. त्यामुळे मधुमेहग्रस्त रुग्णांनी आपल्या शरीराची आणि आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यांना नंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
आपल्या आहाराचा थेट परिणाम मधुमेहावर होतो. जर, तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची (Manage Blood Sugar Level) असेल, तर तुमच्या आहाराचे व्यवस्थापन करणे देखील महत्त्वाचे आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, त्यामुळे मधुमेहींनी आपल्या आहारात सकस आणि नैसर्गिक अन्नाचा समावेश करावा, जेणेकरून या आजारातही ते नेहमी निरोगी राहू शकतील. चला तर, जाणून घेऊया मधुमेहाच्या रुग्णाने कोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत...
दालचिनी : दालचिनी इंसुलिनची क्रिया सुरू करते आणि ती सुधारण्यास मदत करते.
कडुलिंब : कडुलिंबात ग्लायकोसाईड्स आणि ट्रायटरपेनॉइड्स असतात, जे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करतात.
हळद : हळदीमध्ये कर्क्युमिन अँटीऑक्सिडेंट असतात, जे मधुमेहावर फायदेशीर आहेत.
कारले : कारले खायला कडू वाटत असले, तरी त्यात असलेले केराटिन आणि मोमोर्डिसिन हे मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध करतात.
आले : इंसुलिन स्राव नियंत्रित करण्यासाठी आले खूप प्रभावी मानले जाते.
टोमॅटो : टोमॅटो हा ‘व्हिटॅमिन सी’चा समृद्ध स्रोत आहे, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरतो.
जांभूळ : जांभळाच्या बियांमध्ये ‘जांबुलीन’ नावाचा घटक असतो, जो रक्तातील साखर नियंत्रित करतो.
मेथी दाणे : मेथीमध्ये विद्राव्य फायबर आढळते. यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी सुधारते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हेही वाचा :
- Health Care Tips : सर्दीसोबतच कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव करायचाय? मग, आहारात ‘हे’ सुपरफूड नक्की सामील करा!
- CoWin Portal News : कोविन पोर्टलवरून डेटा लीक? आरोग्य मंत्रालयाकडून महत्वाची माहिती... जाणून घ्या नेमकं प्रकरण काय..
- Coronavirus : कोरोनातून बरे झाल्यावर बदला 'या' गोष्टी, पुन्हा संसर्ग होण्यापासून होईल बचाव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )