Durga Visarjan 2022: आज दुर्गा देवीचे विसर्जन, फक्त 2 तासांचा मुहूर्त, जाणून घ्या मातेला निरोप देण्याची योग्य पद्धत आणि विधी
Durga Visarjan 2022 : 5 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजेच आज विजयादशमीला दसऱ्याला दुर्गा देवीचे विसर्जन करण्यात येणार आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर मातेचे विसर्जन करणे खूप शुभ मानले जाते.
Durga Visarjan 2022 : नवरात्रीच्या (Navratri 2022) नऊ दिवसांत सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतो आणि देवीच्या प्रत्येक मंदिरात भाविकांची गर्दी असते. 26 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, देवी दुर्गेच्या मूर्तीचे थाटामाटात वाजतगाजत स्वागत करण्यात आले, मात्र आज 5 ऑक्टोबर 2022 रोजी दशमी तिथीला देवी दुर्गेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाईल. जाणून घ्या देवीच्या विसर्जनाचा मुहूर्त आणि मातेला निरोप देण्याची पद्धत
देवीला थाटामाटात निरोप
तब्बल नऊ दिवस देवी दुर्गेने महिषासुराशी युद्ध केले आणि दशमीला त्याचा वध करून विजय मिळवला. नवरात्रीचा उत्सव देशभरात 9 दिवस साजरा केला जातो आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी देवीला थाटामाटात निरोप दिला जातो.
दुर्गा विसर्जनाचा मुहूर्त कधी?
5 ऑक्टोबर 2022 रोजी म्हणजेच आज विजयादशमीला दसऱ्याला दुर्गा देवीचे विसर्जन करण्यात येणार आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर देवीला निरोप देऊन वर्षभर आशीर्वाद कायम राहोत, अशा शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी शुभ मुहूर्तावर मातेचे विसर्जन करणे खूप शुभ मानले जाते. काही भाविक मातेला निरोप दिल्यानंतरच उपवास सोडतात. हिंदू पंचागानुसार, अश्विन महिन्याची दशमी तिथी 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 02:20 वाजता सुरू होत आहे, जी 5 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 06.21 ते 08.43 पर्यंत दुर्गा विसर्जन करणे शुभ मानले जाईल.
दुर्गा विसर्जन पद्धत
देवी दुर्गेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची पूजा करून आरती करावी.
घटस्थापनेमध्ये पेरलेले बियाणे दुर्गा विसर्जनाच्या दिवशी कुटुंबात वाटून द्यावे.
त्याच वेळी, थोडेसे दागिने आपल्या तिजोरीत ठेवावेत, त्यामुळे पैशाची कमतरता भासत नाही.
उरलेले पाणी नदीत फेकून द्या.
देवी दुर्गेला अर्पण केलेले सर्व साहित्य नऊ दिवस विसर्जित करा.
दिवस - 5 ऑक्टोबर 2022
विसर्जन करण्याचा कालावधी - 2 तास 22 मिनिटे
श्रावण नक्षत्र सुरू - 4 ऑक्टोबर 2022, रात्री 10:51
श्रावण नक्षत्र संपेल - 5 ऑक्टोबर 2022, रात्री 09:15 वाजता
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या
- Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत
- Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय