गोविंदा काळजी घे रे..! दहीहंडी फोडताना दुखापत झाली तर कशी घ्याल काळजी? डॉक्टरांच्या या टिप्स येतील कामी
मनोरे रचताना उंचावरुन खाली पडल्याने अनेक गोविंदांमध्ये अनेकदा ऑर्थोपेडिक दुखापती झाल्याचे पहायला मिळते.
Dahihandi Injuries: महाराष्ट्रात मुंबई आणि इतर भागातही दहीहंडी उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण दहीहंडी फोडताना थरांवर थर चढतात, मनोरे बनतात-कोसळतात. या सगळ्या खेळात अनेकदा गोविंदांना दुखापत होते. जखमा होतात. कधीकधीतर अपंगत्व किंवा मृत्यूही ओढावल्याचं आपण ऐकतो. अशावेळी गोविंदांनी पुरेशी खबरदारी घेत दुखापती कशा टाळाव्यात याबाबत तज्ञांनी सल्ला दिलाय. या लेखाच्या माध्यमातून डॉ अभय छल्लानी या ऑर्थोपेडिक सर्जन यांनी या जखमांवर कसे नियंत्रण मिळवायचे यासह अनेक दहीहंडी फोडताना दुखापत झाली तर कशी काळजी घ्यावी याबाबत टिप्स दिल्या आहेत.
दहीहंडी उत्सवात रचल्या जाणाऱ्या उंच मानवी मनोऱ्यांवरून पडून गंभीर जखमांमुळे कायमस्वरुपी अपंगत्व येऊ शकते किंवा मृत्यू ओढावू शकतो. संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जाणारा दहीहंडीचा उत्सव हा आता एक सागही क्रिडा प्रकार ठरला आहे . दहीहंडी हा उत्साहाबरोबरच गोविंदांना होणाऱ्या अपघातामुळ धोकादायक देखील ठरत आहे. यामध्ये मानवी मनोरे रचून हंडी फोडली जाते. थरावर थर ठढत असताना त्यासाठी शारीरीक संतुलन, बळकटी आवश्यक असते. यादरम्यान फक्त एक चूक गंभीर अपघात आणि ऑर्थोपेडिक दुखापतीस कारणीभूत ठरु शकते.
गोविंदांना मेंदूच्या दुखापतींसह हे धोके
मनोरे रचताना उंचावरुन खाली पडल्याने अनेक गोविंदांमध्ये अनेकदा ऑर्थोपेडिक दुखापती झाल्याचे पहायला मिळते. गोविंदांना केवळ मेंदूच्या दुखापतींचाच धोका नाही तर जखमांचाही तितकाच धोका आहे. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळातील तरुण एक दुसऱ्याच्या पाठीवर चढून मानवी मनोरा तयार करतात. या मनोऱ्याच्या सर्वात वरच्या थरावर असतो तो गोविंदा. तो आपला तोल सांभाळत हंडी फोडतो. मात्र अशावेळी तोल जाऊन पडल्यास फ्रॅक्चर, अँटिरियर क्रूसिएट लिगामेंट (ACL) दुखापत, गुडघा, खांदा आणि घोट्याला होणारी दुखापत, घोट्यासंबंधीत वेदणा, घोट्यावरील अतिरिक्त ताण, सांधे निखळणे, पाठीच्या दुखापती, हाड मोडणे, कोपराला होणारी दुखापत, नितंबास दुखापत होऊ शकते.
बरगड्यांचे हाड मोडणे, फ्रॅक्चर, लंबर कशेरुकाचे फ्रॅक्चर (तीव्र आघात आणि हाड कमकुवत झाल्यामुळे मणक्याचे फ्रॅक्चर दिसून येते). जेव्हा फेमरचे हेड हिप सॉकेटमधून बाहेर पडते तेव्हा हिप डिस्लोकेशन होते, ज्यामुळे अतिशय वेदना होतात.
ऑर्थोपेडिक दुखापतींमुळे तात्काळ दवाखान्यात नेण्याची गरज
गंभीर ऑर्थोपेडिक दुखापतींमुळे गोविंदांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याची आणि त्वरित उपचाराची आवश्यकता भासते.या दुखापतींमुळे एखाद्याच्या दैनंदिन कामात व्यत्यय येतो, तीव्र वेदना होतात आणि त्याची हालचाल आणि गती मर्यादित होते. काहींना आयुष्यभर अंथरुणावर खिळुन रहावे लागू शकते. एखाद्याच्या जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. गोविंदांनी यावेळी विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे.
काय घ्याल काळजी?
- गोविंदांनी ऑर्थोपेडिक दुखापत टाळून आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. अपघाताचा धोका कमी करण्यासाठी वॉर्म-अप करावे.
- चढण्याआधी स्ट्रेचिंग करायला विसरु नका. या उत्सवांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पिरॅमिड फॉर्मेशन दरम्यान संतुलन सुधारणारे व्यायामाती निवड करणे गरजेचे आहे.
- डोक्याच्या संरक्षणासाठी हेल्मेटचा वापर करा , माउथगार्ड, मनगटाचे रक्षण करण्यासाठी बॅंड, कोपर आणि गुडघ्याचे पॅड, जॅकेट, सुरक्षेसाठी बेल्ट आणि मॅग्नेशियम चॉक बॅक यांचा वापर करा.
- दहिहंडीच्या ठिकाणी रुग्णवाहिकेची सोय करा. उत्सवानंतर किरकोळ दुखापतींकरिता कम्प्रेशन रॅप्स आणि कोल्ड थेरपीचा वापर करा.
- खांदा आणि गुडघा निखळणे किंवा मणक्याच्या समस्यांसारख्या ऑर्थोपेडिक दुखापतींवर त्वरीत उपचार करा.
- दहीहंडीच्या वेळी सुरक्षा नियमांचे पालन करा. गोविंदांना ऑर्थोपेडिक दुखापतींबद्दल शिक्षित करणे ही काळाची गरज आहे की असू त्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्या.
हेही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )